મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Bhiwandi News : भिवंडीमध्ये ठाणे पोलिसांची नवी ताकद – फॉरेन्सिक युनिट आणि मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे धमाकेदार उद्घाटन!

दिनांक: 26/09/2025 पोलीस उप आयुक्त कार्यालय, परिमंडळ-२, भिवंडी ठाणे पोलिसांना तंत्रज्ञानाची नवी शस्त्रसज्जता प्राप्त झाली आहे.

વ
વિવેક

1 મિનિટ વાંચન

Bhiwandi News : भिवंडीमध्ये ठाणे पोलिसांची नवी ताकद – फॉरेन्सिक युनिट आणि मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे धमाकेदार उद्घाटन!

दिनांक: 26/09/2025 पोलीस उप आयुक्त कार्यालय, परिमंडळ-२, भिवंडी ठाणे पोलिसांना तंत्रज्ञानाची नवी शस्त्रसज्जता प्राप्त झाली आहे. मा. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि पोलीस सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज परिमंडळ-२, भिवंडी येथे फॉरेन्सिक युनिट आणि फॉरेन्सिक मोबाईल व्हॅनचे लोकार्पण अपर पोलीस आयुक्त (प.प्रा.वि.) विनायक देशमुख यांच्या शुभहस्ते पार पडले.

अत्याधुनिक सुविधा
फॉरेन्सिक युनिटमध्ये प्रशिक्षित स्टाफ तैनात असून मोबाईल व्हॅनमध्ये गुन्ह्याच्या ठिकाणीच शास्त्रशुद्ध पद्धतीने पुरावे गोळा करण्यासाठी अत्याधुनिक साधनसामग्री बसविण्यात आली आहे. ७ वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी ही व्हॅन ठाणे पोलिसांच्या तपासशक्तीत जबरदस्त भर घालणार आहे.

તસવીરો · 1/1

Arrow Keys ⟵ ⟶

शासनाचा उपक्रम
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रभर २५९ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्स कार्यान्वित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या प्रकल्पाचे राज्यस्तरीय लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 27/01/2025 रोजी झाले होते.

उपस्थित मान्यवर
या भव्य कार्यक्रमाला पोलीस उप आयुक्त शशिकांत बोराटे, सहायक पोलीस आयुक्त सचिन सांगळे, विजय मराठे, सहा पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फॉरेन्सिक टीम तसेच अनेक अधिकारी आणि अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्त्व
भिवंडी परिमंडळातील गंभीर गुन्ह्यांची उकल अधिक जलद, अचूक आणि वैज्ञानिक पद्धतीने करण्यासाठी ही फॉरेन्सिक युनिट आणि मोबाईल व्हॅन ठाणे पोलिसांसाठी गेमचेंजर ठरणार आहे.

नागरिकांचा विश्वास – ठाणे पोलिसांची नवी ओळख!

हेही वाचा: Mumbai News : बोरिवलीत 27 वर्षीय तरुणीची 7 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

શેર કરો