Thane Police News : ठाण्यातील मिठाई व्यावसायिकाकडे 5 लाखांची खंडणी मागणारे दोन 'एजंट' गजाआड; गुन्हे शाखेची रंगेहाथ कारवाई
Thane Extortion Latest News : गौरव स्वीट्स'च्या मालकाला धमकावणे पडले महागात; 2 लाख रुपये स्वीकारताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
1 મિનિટ વાંચન

Thane Extortion Latest News : गौरव स्वीट्स'च्या मालकाला धमकावणे पडले महागात; 2 लाख रुपये स्वीकारताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
ठाणे :- ठाण्यातील प्रसिद्ध 'गौरव स्वीट्स' या दुकानाच्या मालकाकडे 5 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन इसमांना ठाणे गुन्हे शाखेने (युनिट 5) Thane Police Unit 5 सापळा रचून रंगेहाथ अटक केली आहे. तडजोडीअंती 2 लाख रुपये स्वीकारताना या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. Thane Latest Crime News
नेमकी घटना काय?
मिठाई व्यावसायिक विरल भानजी पटेल यांनी ठाणे गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती की, दोन इसम त्यांना 5 लाख रुपयांच्या खंडणीसाठी त्रास देत आहेत. या अर्जाची गांभीर्याने दखल घेत गुन्हे शाखा वागळे युनिट-5 च्या पथकाने चौकशी केली. खंडणीची मागणी होत असल्याचे स्पष्ट होताच, पोलिसांनी वसंत विहार शाळेसमोरील चौकात सापळा रचला. 13 मार्च 2026 रोजी, विरल पटेल यांच्याकडून 2 लाख रुपये स्वीकारताना पोलिसांनी दोन्ही आरोपींना झडप घालून पकडले.
अटक करण्यात आलेले आरोपी
1) सुशांत संजय सुर्वे (वय 30): रा. मानपाडा, ठाणे. (व्यवसाय: एजंट)
2) अक्षय जयंत करंजवकर (वय 35): रा. कोलबाड रोड, ठाणे. (व्यवसाय: एजंट)
पोलीस कारवाई आणि कोठडी
या दोन्ही आरोपींविरुद्ध चितळसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 308(2) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 16 मार्च 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी ढगेपाटील करत आहेत.
महत्त्वाची भूमिका
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, उपायुक्त पराग मणेरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
