મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Thane Crime Branch : मोका आरोपीचा शेवट! ठाणे गुन्हे शाखेचा ‘इराणी चेन स्नॅचर’वर कहर — २० चेन स्नॅचिंग गुन्हे उघड, ३० लाखांचे सोने जप्त

ठाणे | विवेक राजेंद्र जगताप ठाणे, भिवंडी, मुंब्रा, उल्हासनगर, अंबरनाथ परिसरात महिलांच्या मानेवर घाव घालणाऱ्या इराणी चेन स्नॅचिंग टोळीला अखेर ठाणे गुन्हे शाखेने चिरडले!

વ
વિવેક

1 મિનિટ વાંચન

Thane Crime Branch : मोका आरोपीचा शेवट! ठाणे गुन्हे शाखेचा ‘इराणी चेन स्नॅचर’वर कहर — २० चेन स्नॅचिंग गुन्हे उघड, ३० लाखांचे सोने जप्त

ठाणे | विवेक राजेंद्र जगताप ठाणे, भिवंडी, मुंब्रा, उल्हासनगर, अंबरनाथ परिसरात महिलांच्या मानेवर घाव घालणाऱ्या इराणी चेन स्नॅचिंग टोळीला अखेर ठाणे गुन्हे शाखेने चिरडले!
मोका गुन्ह्यात पाहिजे असलेला कुख्यात चेन स्नॅचर अब्बास उर्फ बड्डा युनूस सय्यद याला कर्नाटकातील विदर येथून शिताफीने अटक करत गुन्हे शाखेने थरकाप उडवणारी धडक कामगिरी केली आहे. Thane Latest Crime News

चेन स्नॅचिंगचा ‘सुपरकिलर’ गजाआड

पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार जबरी चेन स्नॅचिंगवर आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा सक्रिय असतानाच,
गुन्हे शाखा घटक–२, भिवंडी यांना मोठे यश मिळाले.

તસવીરો · 1/2

Arrow Keys ⟵ ⟶

वपोनि जनार्दन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली
पोउनि रविंद्र पाटील व पथकाने
नारपोली पोलीस ठाण्याच्या गु.र.नं. १०२७/२०२५ चा समांतर तपास करताना
गोपनीय माहितीच्या आधारे अब्बास उर्फ बड्डा याचा माग काढला.

विदर (कर्नाटक) येथून थेट उचल

पोलिसांची चाहूल लागताच राज्याबाहेर पळ काढलेल्या आरोपीला
विदर, कर्नाटक येथून सापळा रचून अटक करण्यात आली.
चौकशीत आरोपीने आपल्या साथीदारांसह २० चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

३० लाखांचा ऐवज, २३२.५ ग्रॅम सोने हस्तगत

आरोपीकडून
● २३२.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने
● ३०,२२,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल
जप्त करण्यात आला आहे.

गुन्हेगारी इतिहास, मोका अडकलेला

अटक आरोपी
● अब्बास उर्फ बड्डा युनूस सय्यद (वय २१)
रा. आंबिवली, कल्याण
याच्यावर यापूर्वीही खडकपाडा पोलीस ठाण्यात चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत.
मोका अंतर्गत पाहिजा आरोपी असल्याने त्याची गुन्हेगारी दहशत सर्वत्र होती.

२० गुन्ह्यांचा थरारक पसारा

नारपोली, भिवंडी शहर, शिवाजीनगर, मुंब्रा, वर्तकनगर, कापुरबावडी, चितळसर, उल्हासनगर, विठ्ठलवाडी अशा
ठाणे जिल्ह्यातील तब्बल २० पोलीस ठाण्यांतील गुन्हे उघडकीस आले आहेत.

गुन्हे शाखेची करडी मुसंडी

ही उल्लेखनीय कारवाई
अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले,
पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव,
सहा. पोलीस आयुक्त शेखर बागडे
यांच्या मार्गदर्शनाखाली

गुन्हे शाखा घटक–२, भिवंडीच्या अधिकाऱ्यांनी व अंमलदारांनी यशस्वीपणे पार पाडली.

महिलांच्या मानेवर घाव घालणाऱ्यांना ठाणे पोलिसांचा थेट इशारा —
“गुन्हा केला तर सुटका नाही!”

શેર કરો