મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Thane Bribe News : अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणीसाठी 2.5 लाखांची लाच घेताना वर्ग-1 ची महिला अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात

•रायगड एसीबीची ठाण्यात धडक कारवाई; उपसंचालक मीनाक्षी उन्हाळे यांना केबिनमध्येच रंगेहाथ पकडले

વ
વિવેક

1 મિનિટ વાંચન

Beed Crime News

•रायगड एसीबीची ठाण्यात धडक कारवाई; उपसंचालक मीनाक्षी उन्हाळे यांना केबिनमध्येच रंगेहाथ पकडले

ठाणे (रायगड) :- जात प्रमाणपत्र पडताळणीची फाईल मंजूर करून देण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या कोकण विभागाच्या उपसंचालिका मीनाक्षी नारायण उन्हाळे (46 वय) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ अटक केली आहे. ठाण्यातील चरई परिसरातील एम.टी.एन.एल इमारतीत असलेल्या कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.

नेमकी घटना काय?

या प्रकरणातील तक्रारदार यांच्या पत्नी आणि मुलीची अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणीची फाईल अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, कोकण विभाग (ठाणे) येथे प्रलंबित होती. ही फाईल क्लिअर करून देण्यासाठी उपसंचालक (संशोधन), वर्ग-1 मीनाक्षी उन्हाळे यांनी तक्रारदाराकडे 2.50 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने (12 मार्च 2026 )रोजी रायगड-अलिबाग एसीबीकडे तक्रार नोंदवली.

एसीबीचा सापळा आणि रंगेहाथ अटक

तक्रारीची शहनिशा करण्यासाठी (13 मार्च 2026) रोजी दुपारी एसीबीच्या पथकाने पडताळणी केली. यावेळी उन्हाळे यांनी अडीच लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.त्यानुसार, त्याच दिवशी सायंकाळीच्या सुमारास चरई येथील कार्यालयात सापळा रचण्यात आला.तक्रारदाराकडून 2 लाख 50 हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वतःच्या केबिनमध्ये स्वीकारताना मीनाक्षी उन्हाळे यांना पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले.

कारवाई करणारे पथक

ही उल्लेखनीय कामगिरी ठाणे एसीबीचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे आणि भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. रायगड एसीबीच्या पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले, पोलीस निरीक्षक निशांत धनवडे आणि त्यांच्या पथकाने या भ्रष्ट अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा: Mumbai Weather Report : हवामानाचा 'डबल' मारा: एका बाजूला उष्माघाताची भीती, तर दुसऱ्या बाजूला 20 मार्चपर्यंत अवकाळी पावसाचे संकट!

શેર કરો