મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : तेजस पाटील भारतीय आशियाई तलवारबाजी संघात!

Pune News : पुणे : जपानमध्ये होणाऱ्या आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय तलवारबाजी (फेन्सिंग) संघाची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये तेजस मनोज पाटील याने भारतीय पुरुषांच्या 'फॉइल' संघात आपले स्थान पक्के केले आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

तेजस पाटील भारतीय आशियाई तलवारबाजी संघात! जपानमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत करणार 'फॉइल' प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व
तेजस पाटील भारतीय आशियाई तलवारबाजी संघात! जपानमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत करणार 'फॉइल' प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व

Pune News : जपानमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत करणार 'फॉइल' प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व


Pune News : पुणे : जपानमध्ये होणाऱ्या आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय तलवारबाजी (फेन्सिंग) संघाची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये तेजस मनोज पाटील याने भारतीय पुरुषांच्या 'फॉइल' संघात आपले स्थान पक्के केले आहे. भारतीय तलवारबाजी संघटनेच्या (फेन्सिंग असोसिएशन ऑफ इंडिया) निवड समितीने नुकतीच या पथकाची अधिकृत घोषणा केली. राष्ट्रीय मानांकन तसेच आशियाई वरिष्ठ तलवारबाजी चॅम्पियनशिप, जागतिक चॅम्पियनशिप आणि राष्ट्रकुल तलवारबाजी चॅम्पियनशिपमधील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे खेळाडूंची अंतिम निवड करण्यात आली आहे. तो पुण्याच्या एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान (एमआयटी-एडीटी) विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. निवड झालेले सर्व खेळाडू पटियाला येथे १५ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या राष्ट्रीय तयारी शिबिरामध्ये सहभागी होतील. त्यानंतर १६ सप्टेंबर रोजी स्पर्धापूर्व वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी संपूर्ण भारतीय संघ थेट जपानमधील आयची-नागोया येथे रवाना होणार आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
तेजस पाटील याने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरी, मेहनत आणि उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर यापूर्वी चीनमधील शांघाय येथे झालेल्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ आणि नायजेरियातील लागोस येथे झालेल्या राष्ट्रकुल तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या ‘फॉइल’ संघात स्थान मिळवले होते. या स्पर्धांमध्ये त्याने दोन रौप्य व एक कांस्य पदक पटकावले होते. आता पुन्हा एकदा आशियाई फेन्सिंग स्पर्धेत पुरुषांच्या 'फॉइल' प्रकारात तो भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याने विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

શેર કરો