મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Technical News डीप टेक तंत्रज्ञानासाठी सक्षम परिसंस्था उभारणार

पुणे, महाराष्ट्र मिरर Technical News : क्वांटम कंप्यूटिंग आणि डीप टेक तंत्रज्ञानामुळे जगभरात मोठी तांत्रिक क्रांती घडत आहे.

વઝ
વિદુલા ઝગડે

2 મિનિટ વાંચન

Technical News डीप टेक तंत्रज्ञानासाठी सक्षम परिसंस्था उभारणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

‘महाराष्ट्राज् ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग अँड फ्रंटियर टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (FTI) ची बैठक संपन्न

पुणे, महाराष्ट्र मिरर Technical News : क्वांटम कंप्यूटिंग आणि डीप टेक तंत्रज्ञानामुळे जगभरात मोठी तांत्रिक क्रांती घडत आहे. या तंत्रज्ञानाचा वेग आणि व्याप्ती लक्षात घेता त्याच्याशी त्वरेने जुळवून घेणे आवश्यक असून, त्यासाठी सक्षम आणि सर्वसमावेशक परिसंस्था (इकोसिस्टीम) उभारणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.Technical News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘महाराष्ट्राज् ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग अँड फ्रंटियर टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (FTI) ची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, २०२४ मध्ये क्वांटम कंप्यूटिंग आणि डीप टेक तंत्रज्ञानाचा जागतिक बाजार सुमारे दोन ते तीन ट्रिलियन डॉलर इतका होता. पुढील पाच वर्षांत तो सोळा ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. मानवी इतिहासात इतक्या वेगाने वाढणारे तंत्रज्ञान यापूर्वी कधीही पाहायला मिळाले नाही. त्यामुळे या परिवर्तनाचा सक्रिय भाग बनणे भारतासाठी अत्यावश्यक आहे.Technical News

फ्रंटियर टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात सरस कामगिरी करणाऱ्या देशांमध्ये आज भारताची गणना होत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत या क्षेत्रात देशाने चांगली प्रगती केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सिलिकॉन तंत्रज्ञान आणि क्वांटम कंप्यूटिंग ही जग बदलणारी तंत्रज्ञाने असून, उद्योग-व्यवसायाच्या प्रत्येक क्षेत्रावर त्यांचा मोठा प्रभाव पडणार आहे. या बदलांशी जुळवून घेण्यासाठी मजबूत परिसंस्था उभारावी लागेल. विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना निधी, तांत्रिक क्षमता आणि कौशल्यांच्या अभावामुळे या तंत्रज्ञानाचा पुरेसा लाभ घेता येत नाही. त्यामुळे सर्वांसाठी उपलब्ध असलेले स्मार्ट प्लॅटफॉर्म, सुविधा आणि सक्षम मनुष्यबळ विकसित करणे गरजेचे आहे.

महाराष्ट्राला जागतिक उत्पादन केंद्र बनविण्यासाठी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा व्यापक प्रसार होणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने क्वांटम कंप्यूटिंग तंत्रज्ञानासाठी विविध योजना सुरू केल्या असून, राज्यातील प्रयत्न त्या योजनांशी सुसंगत राहणे आवश्यक आहे. ‘मित्रा’ संस्था या दिशेने काम करत आहे. ‘मित्रा’च्या माध्यमातून क्वांटम कंप्यूटिंग प्रशिक्षक तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार असून, पुढील दोन ते तीन वर्षांत किमान पाच हजार जणांना या क्षेत्रात प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे.Technical News

मुंबईत विकसित होत असलेल्या ‘इनोव्हेशन सिटी’ प्रकल्पासाठी राज्य शासनाने टाटा समूहाशी भागीदारी केली असून, त्याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. फ्रंटियर टेक इन्स्टिट्यूटचा हा उपक्रम आणि इनोव्हेशन सिटीची संकल्पना परस्परपूरक असल्याने या दोन्ही उपक्रमांमध्ये समन्वय साधून काम करता येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात उपस्थित तज्ज्ञांनी क्वांटम कंप्यूटिंग तंत्रज्ञानाच्या क्षेत्रांतील संधी, संशोधन, उद्योग आणि कौशल्य विकास या विषयांवर चर्चा केली.Technical News

यावेळी इन्स्टिट्यूटचे कन्व्हेनर दीपक करंजीकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.Technical News

શેર કરો