Pune News : स्वारगेट एसटी आगाराच्या एकदिवसीय सहलींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांनी घेतला आनंद
Pune News :पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) स्वारगेट आगाराकडून नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय सहलींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
1 મિનિટ વાંચન

Pune News :पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) स्वारगेट आगाराकडून नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय सहलींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात आलेल्या कास पठार, गोंदवले दर्शन आणि कोकण दर्शन या सहलींमध्ये प्रत्येकी ३०० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेत सहलींचा आनंद लुटला.नागरिकांना कमी खर्चात पर्यटनाचा आनंद घेता यावा, या उद्देशाने स्वारगेट आगाराकडून या सहलींचे आयोजन करण्यात आले होते. सहलीच्या शुल्कामध्येच नाश्ता, जेवण, पाण्याची बाटली आणि टोपी यांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्या.https://maharashtramirror.com/ Pune News
एसटी महामंडळाच्या या उपक्रमामुळे नागरिकांना कुटुंबीयांसह धार्मिक आणि पर्यटनस्थळांना भेट देण्याची संधी मिळत आहे. एकाच दिवसात नियोजनबद्ध पद्धतीने पर्यटनाचा आनंद घेता येत असल्याने या सहलींना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, पुढील महिन्यातही नागरिकांसाठी शिवथरघळ आणि सज्जनगड या पर्यटन व धार्मिक स्थळांच्या एकदिवसीय सहलींचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळातही एसटीच्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.
