મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Mumbai News : खासदार सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा

Mumbai News : मुंबई: “राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंकडेही ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

खासदार सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा
खासदार सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा

Mumbai News : मुंबई: “राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंकडेही ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. एवढ्यावर न थांबता त्यांनी थेट अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसीचे प्रमाणपत्र असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस पक्षाच्या एका बड्या नेत्याने केलेल्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News

“काँग्रेसचं काय चाललंय? मला आज राहुलजींना फोन करावाच लागेल. मी जरा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी, दिल्लीतल्या नेत्यांशी बोलते. हे हास्यास्पद आहे. अरे माझ्याकडे सर्टिफिकेट कसं असेल ओ? मला हसू येत आहे. किती खोटे आरोप करायचे एखाद्या माणसावर? त्याची पण एक मर्यादा असते. दुर्देवी आहे की काँग्रेसचे नेते का मला टार्गेट करुन माझ्याबद्दल खोटं परसवत आहेत याच्याबद्दल मी आता काँग्रेस नेतृत्वाशी बोलणार आहे.” अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली. माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र कसं असेल? असा सवालही सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला. वडेट्टीवारांनी केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेत सुळे यांनी त्यांनी आपली माफी मागावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी आपण केलेल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. त्यामुळे सुळे-वडेट्टीवार यांच्यातील हा वाद आता निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे https://maharashtramirror.com/ Mumbai News

શેર કરો