Sunetra Pawar : ढिगाऱ्याखाली आणखी ६ मृतदेह असण्याची भीती; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची माहिती
पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र मिरर
2 મિનિટ વાંચન

sunetra pawar : ६८ तासांनंतरही युद्धपातळीवर बचावकार्य
पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र मिरर
sunetra pawar : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपो परिसरातील तीन मजली प्रशासकीय इमारत कोसळल्याच्या भीषण दुर्घटनेला ६५ तासांपेक्षा अधिक वेळ उलटून गेला आहे. मात्र, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ८ कर्मचाऱ्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, या मलब्याखाली आणखी ६ मृतदेह असण्याची भीती राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली आहे. (sunetra pawar update on moshi garbage depot collapse )
१२ ते १३ पोकलेन मशिन्सद्वारे अहोरात्र काम
दुर्घटनास्थळावरील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, "ढिगारा उपसण्यासाठी सध्या १२ ते १३ पोकलेन मशिन्स अहोरात्र काम करत आहेत. काँक्रीटचे मोठे आणि जड ब्लॉक फोडण्यासाठी क्रशर मशीनचाही वापर केला जात आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना शोधण्यासाठी एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणा तपास करत आहे. मदतकार्य आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून, प्रशासकीय यंत्रणा ढिगाऱ्याखालील प्रत्येक जीवाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. (sunetra pawar)

नेमकं काय म्हणाल्या सुनेत्रा पवार?
पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे कचऱ्याचा डोंगर खचून झालेल्या इमारत दुर्घटनेत बचावकार्य अत्यंत युद्धपातळीवर सुरू आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावर भाष्य करताना ढिगाऱ्याखाली आणखी ६ मृतदेह असण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच, गारा उपसण्यासाठी १२ ते १३ पोकलेन मशिन्स कार्यरत असून एनडीआरएफ, लष्कर आणि अग्निशामक दलाचे जवान ढिगारा हटवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (moshi )
Moshi Building Collapse : मोशी कचरा डेपोच्या भ्रष्टाचाराचा आका कोण ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा व निर्देश
दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोशी येथील या संपूर्ण घटनाक्रमाचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिका आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना ब्रीफिंग करताना सांगितले की, प्रशासन बचावाचे काम लवकरच पूर्ण करेल. (sunetra pawar)

याशिवाय, मुख्यमंत्र्यांनी शहरातील कचरा व्यवस्थापनावरही गंभीर चिंता व्यक्त केली. दररोज प्रक्रिया न होता साचणाऱ्या सुमारे १०० टन कचऱ्यावर तातडीने प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र आणि प्रभावी व्यवस्था उभारण्याबाबत प्रशासनाला त्यांनी कडक निर्देश दिले आहेत.
पुनावळे आरक्षण रद्द झाल्याने कचऱ्याचा प्रश्न जटील
या दुर्घटनेने पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा व्यवस्थापनाचा अत्यंत जटील प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला आहे. संपूर्ण शहरातील कचरा सन १९९१ पासून मोशीतील डेपोत टाकला जात असून, या डेपोची क्षमता आता पूर्णपणे संपुष्टात आली आहे.

वाढत्या लोकसंख्येचा विचार करून प्रशासनाने २००८ मध्ये पुनावळे येथे वन विभागाच्या २२.८ हेक्टर जागेवर कचरा डेपोचे आरक्षण टाकले होते. त्यासाठी वनीकरणाचे ३ कोटी ५७ लाख रुपये वन विभागाला देण्यात आले होते. तसेच, या जागेच्या बदल्यात चंद्रपूर जिल्ह्यातील वन विभागाच्या शेजारील २३ हेक्टर जमीन खरेदी करून वन विभागाला दिली जाणार होती. परंतु, स्थानिक पातळीवर झालेल्या तीव्र राजकीय विरोधानंतर महापालिकेने पुनावळे येथील कचरा डेपोचे आरक्षण रद्द केले. पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने आणि मोशी डेपोची क्षमता संपल्याने शहरातील कचऱ्याचा प्रश्न आता अत्यंत गंभीर आणि जटील बनला आहे. (sunetra pawar)
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
सध्या संपूर्ण शहराचे लक्ष मोशी येथील बचावकार्याकडे लागले असून, मलब्याखालील कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी संपूर्ण यंत्रणा आपले सर्वस्व पणाला लावत आहे.
