Pune News : ऐन सणासुदीत साखरेच्या दारात वाढ
ऐन सणासुदीत साखरेच्या दारात वाढ
1 મિનિટ વાંચન

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी – सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याने यंदाच्या गणेशोत्सवात मिठाईच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. साखरेच्या किरकोळ दरात गेल्या काही दिवसांत सुमारे २० रुपयांनी वाढ झाल्याने गृहिणीं आणि देशातील प्रत्येक कुटुंबाचे खर्च करण्याचे गणित बिघडले आहे. श्रावण आणि भाद्रपद हे सण-उत्सवांचे महिने असल्याने या काळात गोडधोड पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिठाई, मोदक आणि विविध गोड पदार्थांची खरेदी वाढणार असतानाच साखरेच्या दरवाढीचा फटका ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून साखरेच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती बजेटवरही अतिरिक्त भार पडत आहे. https://maharashtramirror.com/ Pune News
सणासुदीला साखरेची मागणी वाढणे हे दरवाढीमागील प्रमुख कारण मानले जाते. मात्र, साखरेच्या वाढत्या किमतीमुळे मिठाई तयार करण्याचा खर्चही वाढत असून त्याचा परिणाम थेट मिठाईच्या विक्री दरावर होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गणेशोत्सवात गोड पदार्थांचा आस्वाद घेताना नागरिकांना यंदा अधिक पैसे मोजावे लागू शकतात.https://maharashtramirror.com/ Pune News
रुपाली गायकवाड (गृहिणी) म्हणाल्या "सध्या महागाईने सीमा ओलांडली असून अन्नधान्य, भाजीपाला आणि फळांचे भाव गगनाला भिडले आहेत. ऐन गणेशोत्सवात घरोघरी गोडधोड बनवण्यासाठी लागणाऱ्या साखरेच्या दरातही मोठी वाढ झाल्यामुळे, सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांचे घरगुती बजेट पूर्णपणे कोलमडले आहे https://maharashtramirror.com/ Pune News
ऊस लागवडीतील घट, कमी पाऊस आणि साखर कारखान्यांचा मनमानी कारभार यामुळे यंदा साखरेच्या बाजारावर परिणाम झाला आहे. घाऊक बाजारातील व्यापारी चढ्या दराने साखर खरेदी करण्यास तयार असतानाही बाजारात साखरेची उपलब्धता कमी असून पुरवठ्यासाठी विलंब होत आहे. त्यामुळे साखरेचे दर यंदा कायम राहण्याची शक्यता असून, पुढील वर्षी ऊस उत्पादन आणखी घटल्यास साखरेचा तुटवडा जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (कमलेश गोयल मार्केटयार्ड व्यापारी)
