મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : आंतर-महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेत एस. पी. कॉलेजचे चार सुवर्णपदकांसह निर्विवाद वर्चस्व!

Pune News : पुणे : मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्या वतीने आयोजित आंतर-महाविद्यालयीन बॉक्सिंग (पुरुष व महिला) स्पर्धा २०२६-२७ चे उद्घाटन अरुण कुमार वैद्य स्टेडियम, भवानी पेठ, पुणे येथे उत्साहात पार पडले.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

आंतर-महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेत एस. पी. कॉलेजचे चार सुवर्णपदकांसह निर्विवाद वर्चस्व!
आंतर-महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेत एस. पी. कॉलेजचे चार सुवर्णपदकांसह निर्विवाद वर्चस्व!

Pune News : पुणे : मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्या वतीने आयोजित आंतर-महाविद्यालयीन बॉक्सिंग (पुरुष व महिला) स्पर्धा २०२६-२७ चे उद्घाटन अरुण कुमार वैद्य स्टेडियम, भवानी पेठ, पुणे येथे उत्साहात पार पडले. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी माजी गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. रमेशदादा बागवे तसेच मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. किशोर निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे महासचिव भरतकुमार व्हावळ, शिवछत्रपती पुरस्कार विजेते विजय यादव व रेनॉल्ड जोसेफ, पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव अभिमन्यू सूर्यवंशी तसेच पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव विजय गुजर, डॉ. गणेश पतारे, शारीरिक शिक्षण संचालक अनिल गिरीगोसावी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेची संपूर्ण तांत्रिक व रिंग ऑफिशियल्सची जबाबदारी पुणे शहर बॉक्सिंग संघटनेकडे सोपविण्यात आली होती. ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सुरेशकुमार गायकवाड, अशोक मेमजादे, जीवनलाल निदाने, यांच्यासह सर्व पंचांसह मराठवाडा मित्र मंडळ कॉलेजच्या सर्व स्टाफने सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

सकाळी 11 वाजता सर्व महाविद्यालयांमधून सहभागी झालेल्या पुरुष व महिला बॉक्सर्सच्या लढतींना सुरुवात झाली. या स्पर्धेच्या माध्यमातून महाविद्यालयीन स्तरावरील खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले

🥊 महिला बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीचे निकाल पुढील प्रमाणे:-
१. वजन गट – ४८ किलो विजेती – सृष्टी चोरगे (आबासाहेब गरवारे कॉलेज)
उपविजेती – स्वप्ना गवळी (काशीबाई नवले कॉलेज)

२. वजन गट – ५१ किलो विजेती – ज्ञानदा जमादार (एस. पी. कॉलेज)
उपविजेती – सावि तांदेलकर (एम. एम. सी. सी. कॉलेज)

३. वजन गट – ५४ किलो विजेती – वैष्णवी कदम (एस. पी. कॉलेज)
उपविजेती – भूमिका खिल्लारे (एस. पी. कॉलेज)

४. वजन गट – ५७ किलो विजेती – दर्शना बायले (एस. पी. कॉलेज)
उपविजेती – आसना शेख (नौरोजी वाडिया कॉलेज)

५. वजन गट – ७५ किलो विजेती – वैष्णवी हगवणे (एस. पी. कॉलेज)
उपविजेती – आलिशा शेख (एम. एम. सी. लॉ कॉलेज)

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો