મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Delhi News : स्मृती इराणींचे राज्यसभेतून संसदीय राजकारणात पुनरागमन? भाजपकडून तयारी सुरू

Delhi News : नवी दिल्ली : २०२४च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीतून पराभव झाल्यानंतर केंद्रीय राजकारणापासून काही काळ दूर राहिलेल्या भाजप नेत्या स्मृती इराणी यांचे लवकरच संसदीय राजकारणात पुनरागमन होण्याची शक्यता आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

स्मृती इराणींचे राज्यसभेतून संसदीय राजकारणात पुनरागमन? भाजपकडून तयारी सुरू
स्मृती इराणींचे राज्यसभेतून संसदीय राजकारणात पुनरागमन? भाजपकडून तयारी सुरू

Delhi News : नवी दिल्ली : २०२४च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीतून पराभव झाल्यानंतर केंद्रीय राजकारणापासून काही काळ दूर राहिलेल्या भाजप नेत्या स्मृती इराणी यांचे लवकरच संसदीय राजकारणात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. भाजपकडून त्यांना उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.https://maharashtramirror.com/ Delhi News

उत्तर प्रदेशातून राज्यसभेच्या दहा जागांसाठी निवडणूक होत असून, सध्याच्या विधानसभा संख्याबळाच्या आधारे यापैकी आठ जागा भाजपच्या खात्यात जाण्याची शक्यता आहे. या आठ जागांसाठी भाजपच्या संभाव्य उमेदवारांच्या नावांवर पक्षांतर्गत चर्चा सुरू असून, स्मृती इराणी यांच्यासह सुमारे २० नावांचा विचार केला जात असल्याचे समजते.https://maharashtramirror.com/ Delhi News

दरम्यान, उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या दहा जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपसह समाजवादी पक्षानेही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

उत्तर प्रदेश विधानसभेतील सध्याचे संख्याबळ लक्षात घेता भाजपला आठ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आठ जागांसाठी कोणाची वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. स्मृती इराणी यांचे नाव संभाव्य उमेदवारांच्या यादीत असल्याने त्यांच्या संसदीय राजकारणातील पुनरागमनाची चर्चा अधिक रंगली आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો