Pune Crime: ऐतिहासिक सिंहगडावर सुरक्षेचा बोजवारा; गर्दीचा गैरफायदा घेत तरुणींशी असभ्य वर्तन, हाणामारी अन् दगडफेक
गर्दीत महिलांची सुरक्षितता धोक्यात
2 મિનિટ વાંચન

गर्दीत महिलांची सुरक्षितता धोक्यात https://maharashtramirror.com/
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने (१५ ऑगस्ट) हजारो पर्यटकांनी गजबजलेल्या ऐतिहासिक सिंहगडावर सुरक्षाव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा गंभीर आरोप पर्यटकांनी केला आहे. प्रचंड गर्दीचा गैरफायदा घेत काही तरुणांकडून महिला व तरुणींशी असभ्य वर्तन आणि जाणीवपूर्वक चुकीचा स्पर्श केल्याचा आरोप करण्यात आला. त्याचवेळी दोन गटांमध्ये हाणामारी आणि दगडफेक झाल्याने गडावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकारामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. https://maharashtramirror.com/

सिंहगडावर स्वातंत्र्यदिनानिमित्त मोठ्या संख्येने नागरिक दाखल झाले होते. गडावर जाणाऱ्या आणि विशेषतः परतीच्या मार्गावर प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीचे प्रभावी नियोजन आणि नियंत्रण करण्यात प्रशासनाला अपयश आल्याचा आरोप पर्यटकांकडून करण्यात आला आहे. गर्दीमध्ये काही टवाळखोरांकडून महिलांना आणि तरुणींना जाणीवपूर्वक चुकीचा स्पर्श केला जात असल्याचे काही पर्यटकांनी सांगितले. (maharashtra mirror)
गर्दीत महिलांची सुरक्षितता धोक्यात
कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींसोबत सिंहगडावर आलेल्या महिला पर्यटकांना गर्दीमुळे मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. गर्दीचा फायदा घेत काही विकृत प्रवृत्तीचे लोक महिलांशी असभ्य वर्तन करत असल्याचा दावा एका पर्यटकाने केला आहे. अशा प्रकारांवर तातडीने नियंत्रण ठेवण्यासाठी महिला पोलिसांची तसेच सुरक्षारक्षकांची पुरेशी व्यवस्था का करण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. (maharashtra mirror)
हाणामारी अन् दगडफेकीने उडाली खळबळ
गडावरील गर्दीदरम्यान हुल्लडबाजांच्या दोन गटांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यानंतर दगडफेक झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. या प्रकारामुळे आसपासच्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दगडफेकीत एखाद्या पर्यटकाला गंभीर दुखापत झाली असती तर त्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. (maharashtra mirror)
गुटखा खाल्ल्याने पर्यटकाला १०० उठाबशांची शिक्षा?
दरम्यान, गडावर एका पर्यटकाने गुटखा खाल्ल्याच्या कारणावरून स्थानिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याला तब्बल १०० उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्याचा प्रकारही समोर आला आहे. गडाचे पावित्र्य राखणे आणि व्यसनांना आळा घालणे निश्चितच आवश्यक आहे. मात्र अशा प्रकारची कारवाई करण्यापेक्षा हजारो पर्यटकांच्या सुरक्षेला आणि गर्दीच्या व्यवस्थापनाला प्राधान्य देणे अधिक गरजेचे असल्याचे पर्यटकांचे म्हणणे आहे. (maharashtra mirror)
प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
सिंहगड हा पुण्याचा ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा वारसा आहे. स्वातंत्र्यदिनासारख्या गर्दीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटक येणार हे प्रशासनाला माहीत असतानाही गर्दी नियंत्रण, महिला सुरक्षा, पोलिस बंदोबस्त आणि आपत्कालीन व्यवस्थेबाबत पुरेसे नियोजन झाले होते का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (maharashtra mirror)
महिलांशी असभ्य वर्तन, हाणामारी आणि दगडफेकीसारखे प्रकार घडत असतील तर त्यांची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा गर्दीच्या दिवशी सिंहगडावर स्वतंत्र आणि प्रभावी सुरक्षा व्यवस्था उभारावी, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे. या आरोपांबाबत प्रशासन आणि पोलिसांची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नसून, संबंधित प्रकारांची चौकशी करून दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे. (maharashtra mirror)
