મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune Crime : सिंहगड रोडवर रेकॉर्डवरील आरोपीकडून पिस्तूल जप्त

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : सिंहगड रोड पोलिसांनी हिंगणे खुर्द परिसरात कारवाई करत रेकॉर्डवरील आरोपीकडून गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

सिंहगड रोडवर रेकॉर्डवरील आरोपीकडून पिस्तूल जप्त
सिंहगड रोडवर रेकॉर्डवरील आरोपीकडून पिस्तूल जप्त

Pune Crime : हिंगणे खुर्दमध्ये पोलिसांची कारवाई; गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस हस्तगत

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : सिंहगड रोड पोलिसांनी हिंगणे खुर्द परिसरात कारवाई करत रेकॉर्डवरील आरोपीकडून गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. सिद्धेश सुरेश पवार (वय ३१, रा. विश्रांतीनगर, हिंगणे खुर्द, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे तपास पथक ११ सप्टेंबर रोजी हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार प्रफुल्ल चव्हाण आणि युवराज कांबळे यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, विश्रांतीनगरकडून जनता वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शंकर मंदिराजवळ एक व्यक्ती अग्निशस्त्र घेऊन थांबली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक भुपेश साळुंके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी जाऊन संशयिताला ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ४० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि एक हजार रुपये किमतीचे जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी एकूण ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियम कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भुपेश साळुंके करीत आहेत.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक भुपेश साळुंके यांच्या पथकातील पोलीस हवालदार चव्हाण, बांदल तसेच पोलीस अंमलदार कांबळे, शेडगे, ओलेकर आणि सागर यांनी केली.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો