મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : शॉपर्स स्टॉपकडून पुण्यामध्ये विशेष दिवाळी फॅशन शोकेसचे आयोजन, फेस्टिव्ह कलेक्शनचे आकर्षक सादरीकरण

Pune News :पुणे, : शॉपर्स स्टॉप या भारतामधील फॅशन, ब्युटी आणि गिफ्टिंग क्षेत्रातील आघाडीच्या प्रीमियम ब्रँडने पुण्यातील पॅव्हेलियन मॉल येथे एका विशेष फॅशन शोकेसचे आयोजन करून दिवाळीचा उत्सवी आनंद अधिक उत्साहित केला.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

शॉपर्स स्टॉपकडून पुण्यामध्ये विशेष दिवाळी फॅशन शोकेसचे आयोजन, फेस्टिव्ह कलेक्शनचे आकर्षक सादरीकरण
शॉपर्स स्टॉपकडून पुण्यामध्ये विशेष दिवाळी फॅशन शोकेसचे आयोजन, फेस्टिव्ह कलेक्शनचे आकर्षक सादरीकरण

Pune News :पुणे, : शॉपर्स स्टॉप या भारतामधील फॅशन, ब्युटी आणि गिफ्टिंग क्षेत्रातील आघाडीच्या प्रीमियम ब्रँडने पुण्यातील पॅव्हेलियन मॉल येथे एका विशेष फॅशन शोकेसचे आयोजन करून दिवाळीचा उत्सवी आनंद अधिक उत्साहित केला. दिवाळीचे औचित्य साधून सादर करण्यात आलेल्या या खास फेस्टिव्ह फॅशन कलेक्शनमध्ये आधुनिक शैली आणि पारंपरिकतेचा अप्रतिम संगम पाहायला मिळाला, जो दिवाळीतील विविध सण-प्रसंगांना अधिक खास बनवतो.https://maharashtramirror.com/ Pune News

दिवाळीच्या विविध रंगछटांवरून प्रेरित होऊन या कलेक्शनमध्ये चार वेगवेगळ्या फॅशन थीम्स सादर करण्यात आल्या होत्या, ज्या सणासुदीच्या वेगवेगळ्या क्षणांचे प्रतिनिधित्व करतात. दिवाळी होमकमिंगने कॅज्युअल वेस्टर्न वेअरसह या शोची सुरुवात केली, ज्यामधून उत्सवासाठी घरी परततानाचा आनंद आणि उत्साह दिसून आला. दिवाळी गेम नाइट लूकने पार्टीवेअर आणि आधुनिक वेस्टर्न स्टाइल्स रॅम्पवर आणत मित्र आणि कुटुंबीयांसोबत साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवी संध्याकाळांमधील मज्जा व ग्लॅमरचे दर्शन घडवले. फॅमिली गेट-टुगेदर लूकने फ्युजन आणि इंडो-वेस्टर्न पोशाखांची ओळख करून दिली, ज्यामध्ये आधुनिक डिझाइन्सचा सणांच्या परंपरेशी सुंदर मेळ साधण्यात आला होता. तर फेस्टिव्ह सेलिब्रेशन एडिटने भव्य सणासुदीच्या क्षणांसाठी परिपूर्ण असलेल्या पारंपरिक भारतीय एथनिक वेअरचे चिरंतन सौंदर्य दर्शवले. एकत्रित, घरी परतण्याच्या साधेपणापासून कौटुंबिक स्नेहमेळावे आणि भव्य उत्सवांपर्यंत दिवाळीच्या सर्व छटा या विविध लूक्समधून प्रभावीपणे मांडण्यात आल्या.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

શેર કરો