Pune News : शिरूर पोलीस ठाण्यातील दोन हवालदारांवर लाचेप्रकारणी कारवाई
Pune News : पुणे: शिरूर पोलीस ठाण्यातील भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या दोन स्वतंत्र प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी, पुणे) धडक कारवाई केली आहे.
2 મિનિટ વાંચન

Pune News : ११ हजारांची लाच घेताना एक रंगेहाथ अटक, तर ९५ हजार घेऊन दुसरा पसार
Pune News : पुणे: शिरूर पोलीस ठाण्यातील भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या दोन स्वतंत्र प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी, पुणे) धडक कारवाई केली आहे. दाखल गुन्ह्यांमध्ये तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांना अटक न करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या दोन पोलीस हवालदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News
या कारवाईत एका पोलीस हवालदाराला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे, तर दुसरा हवालदार ९५ हजार रुपयांच्या लाचेच्या रक्कमेसह पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. https://maharashtramirror.com/ Pune News
११ हजार रुपयांची लाच स्वीकारताना हवालदार जाळ्यात
पहिली कारवाई जुने शिरूर पोलीस ठाणे परिसरात करण्यात आली. शिरूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात (बीएनएस कलम ३२९(३), ३२४(४), ३(५)) एका २९ वर्षीय तक्रारदारासह त्यांच्या आई-वडिलांना अटक न करता नोटीस देऊन सोडण्यासाठी पोलीस हवालदार शिवाजी ज्योतीराम बनकर (वय ४४, ब. नं. २४३६) यांनी १५,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने अटकेच्या भीतीने सुरुवातीला ५,००० रुपये दिले. त्यानंतर हवालदार बनकर यांनी उर्वरित १०,००० रुपयांसाठी तगादा लावल्याने तक्रारदाराने २९ सप्टेंबर २०२६ रोजी एसीबी पुणे कार्यालयात तक्रार नोंदवली. पडताळणीदरम्यान बनकर यांनी ४,००० रुपये स्वीकारल्याचे मान्य करत उर्वरित ११,००० रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.
दिनांक ३० सप्टेंबर २०२६ रोजी टाकलेल्या सापळ्यात हवालदार बनकर यांनी पोलीस स्टेशनबाहेर रस्त्याच्या कडेला ११,००० रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून रात्री २१:३३ वाजता अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे यांच्या पथकाने केली.
९५ हजारांची लाच स्वीकारून हवालदार फरार
दुसऱ्या घटनेत, शिरूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात (बीएनएस कलम १२६(२), ३०३(२), ३२४(४), ३(५)) ५९ वर्षीय तक्रारदार व त्यांच्या कुटुंबाला अटक न करण्यासाठी पोलीस हवालदार सतीश नाथाराव मुंढे (वय ४५) याने १,००,००० रुपयांची लाच मागितली होती.
३० सप्टेंबर २०२६ रोजी टाकळी हाजी पोलीस चौकी येथे केलेल्या पडताळणीत हवालदार मुंढे याने स्वतःसाठी व वरिष्ठांच्या नावाने तडजोडीअंती ९५,००० रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्याच दिवशी रचलेल्या सापळा कारवाईत मुंढे याने पंचासमक्ष ९५,००० रुपये स्वीकारले. मात्र, एसीबीच्या सापळा पथकाची चाहूल लागताच आरोपी सतीश मुंढे स्विकारलेल्या ९५,००० रुपयांच्या रक्कमेसह अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पळून गेला.
आरोपी हवालदार मुंढे याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ चे कलम ७ आणि बीएनएस कलम २३८ अन्वये शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून त्याचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे यांच्या पथकाने केली.
वरिष्ठांचे मार्गदर्शन व एसीबीचे आवाहन
सदर दोन्ही कारवाया लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि पोलीस उप अधीक्षक सतीश वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी अथवा लोकसेवकाने लाच मागितल्यास नागरिकांनी घाबरून न जाता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. कार्यालय पत्ता: सी बराक, सेंट्रल बिल्डिंग, पुणे – ४११००१ टोल फ्री / व्हॉट्सॲप नंबर: १०६४ / ९४०३७८१०६४ ई-मेल: dyspacbpune@mahapolice.gov.in / spacbpune@mahapolice.gov.in
