Pune News : शिरूरमध्ये पहाटे गोळीबार; तरुणाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ
Pune News : पुणे: पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात शुक्रवारी भल्या पहाटे गोळीबाराची धक्कादायक घटना घडली.
1 મિનિટ વાંચન

Pune News : पुणे: पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात शुक्रवारी भल्या पहाटे गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात हरी गंगावणे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. पहाटेच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास लाटेआळी परिसरात गोळीबाराचा आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने स्थानिक नागरिकांनी धाव घेतली असता हरी गंगावणे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. गोळ्या लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. https://maharashtramirror.com/ pune News
घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले, पोलीस निरीक्षक विनोद पाटील तसेच फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांना घटनास्थळावरून काही रिकामी काडतुसे मिळाली असून ती जप्त करण्यात आली आहेत.
हा गोळीबार जुन्या वैमनस्यातून झाला की त्यामागे अन्य कोणते कारण आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेचा पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.
