Satara Crime News : चिरमुऱ्यांच्या पोत्याआड लपवून गुटख्याची तस्करी; पंचवीस लाखांचा मुद्देमाल जप्त
सातारा, महाराष्ट्र मिरर Satara Crime News : चिरमुऱ्यांच्या पोत्यांच्या आड लपवून प्रतिबंधित गुटख्याची सांगलीहून पुण्याकडे तस्करी करणारा ट्रक सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतला.
1 મિનિટ વાંચન

सातारा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
सातारा, महाराष्ट्र मिरर Satara Crime News : चिरमुऱ्यांच्या पोत्यांच्या आड लपवून प्रतिबंधित गुटख्याची सांगलीहून पुण्याकडे तस्करी करणारा ट्रक सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतला. या कारवाईत सुमारे १७ लाख ६५ हजार ९४० रुपयांचा गुटखा आणि ७ लाख ५० हजार रुपयांचा ट्रक असा एकूण २५ लाख १५ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.Satara Crime News
पोलिसांना एमएच-१०/झेड-४६९६ या क्रमांकाच्या मालवाहू ट्रकमधून सांगलीकडून पुण्याकडे बंदी असलेला गुटखा नेला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सोमवारी (दि.३) मध्यरात्री सातारा तालुक़्यातील नागठाणे येथील हायवे पुलाजवळ मध्यरात्री सापळा रचून संशयित ट्रक अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये चिरमुऱ्यांच्या पोत्यांच्या आड मोठ्या प्रमाणात विमल पानमसाला आणि तंबाखू लपवून ठेवण्यात आल्याचे उघड झाले. १७ लाख ६५ हजार ९४० रुपयांचा गुटखा आणि ७ लाख ५० हजार रुपयांचा ट्रक असा एकूण २५ लाख १५ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाअसून, एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे.Satara Crime News

घटनेची माहिती मिळताच अन्न सुरक्षा अधिकारी रुपाली खापणे घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी जप्त केलेला अवैध गुटखा ताब्यात घेतला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, सहायक पोलिस निरीक्षक रोहित फार्णे, मच्छिंद्रनाथ पाटील, पोलीस अंमलदार आतिश घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, अमित झेंडे, प्रविण फडतरे, अविनाश चव्हाण, सुजित भोसले, अमित सपकाळ, स्वप्नील शिंदे, अरुण पाटील, स्वप्नील कुंभार, किरण जगताप, लैलेश फडतरे, ओंकार यादव, अमित माने, मोहन पवार, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, रोहित निकम, तसेच बोरगाव पोलीस ठाण्याचे दिपकुमार मांढवे, निलेश गायकवाड, सुनिल कर्णे, जगदीश कणसे, विशाल जाधव, धीरज महाडीक, ज्ञानेश ढाणे, केतन जाधव व अमोल कणसे यांनी केली आहे.Satara Crime News
Satara Crime News
