મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Sanjay Raut : "तुरुंगाच्या भिंती मागचं सत्य… मुख्यमंत्र्यांच्या दारात!" – संजय राऊत यांचं 'नरकातला स्वर्ग' पुस्तक मुख्यमंत्री फडणवीस यांना भेट

Sanjay Raut: लोकशाहीत विरोधकांना गप्प करण्याचा प्रयत्न!" – राऊत यांच्या पत्रातून व्यवस्थेवर थेट हल्ला

વ
વિવેક

1 મિનિટ વાંચન

Sanjay Raut : "तुरुंगाच्या भिंती मागचं सत्य… मुख्यमंत्र्यांच्या दारात!" – संजय राऊत यांचं 'नरकातला स्वर्ग' पुस्तक मुख्यमंत्री फडणवीस यांना भेट

Sanjay Raut: लोकशाहीत विरोधकांना गप्प करण्याचा प्रयत्न!" – राऊत यांच्या पत्रातून व्यवस्थेवर थेट हल्ला

मुंबई :- "गजाआडचं चिंतन, यातनांचे प्रतिबिंब आणि लोकशाहीतील दडपशाहीचा दस्तावेज" – अशा शब्दांत वर्णन होत असलेल्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाची प्रत खासदार संजय राऊत यांनी राज्याचे देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्रासह पाठवली आहे.

राजकीय आरोपांमुळे तुरुंगात गेलेल्या राऊत यांच्या लेखणीतून साकारलेलं हे पुस्तक सध्या महाराष्ट्रात प्रचंड गाजत आहे. केवळ वाचनाचा अनुभव नाही, तर "व्यवस्थेवर आरसा दाखवणारा हा दस्तऐवज आहे" असं समीक्षकांचं म्हणणं आहे.

खासदार राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे:

"खोट्या आरोपांत मला 100 दिवस तुरुंगात डांबण्यात आलं. माझ्या कुटुंबावर मानसिक आघात झाला. विरोधकांना दडपण्यासाठी सत्तेचा वापर केला जात आहे. गजाआडच्या त्या काळाने मला अंतर्मुख केलं – आणि हेच अनुभव शब्दबद्ध करत मुख्यमंत्र्यांसमोर ठेवतो आहे."

या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात साहित्य व राजकारणाचं अनोखं मिश्रण पाहायला मिळालं. मंचावर उपस्थित होते ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर, शरद पवार, आणि उद्धव ठाकरे या तिघांच्या उपस्थितीने प्रकाशन सोहळा एक भव्य आणि ऐतिहासिक क्षण ठरला.

दरम्यान, 'नरकातला स्वर्ग' ला वाचकांकडून अल्पावधीतच स्फोटक प्रतिसाद मिळत आहे. राज्यभर या पुस्तकावर चर्चा सुरु आहे, आणि राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.

શેર કરો