મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Mumbai news : जरांगेंचे उपोषण सरकारसाठी ‘गळ्याचा फास’ : संजय राऊत

Mumbai news : मुंबई, महाराष्ट्र मिरर: मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असतानाही सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

जरांगेंचे उपोषण सरकारसाठी ‘गळ्याचा फास’ : संजय राऊत प्रकृती खालावूनही सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप; चर्चा करून मार्ग काढण्याची मागणी
जरांगेंचे उपोषण सरकारसाठी ‘गळ्याचा फास’ : संजय राऊत प्रकृती खालावूनही सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप; चर्चा करून मार्ग काढण्याची मागणी

Mumbai news : प्रकृती खालावूनही सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप; चर्चा करून मार्ग काढण्याची मागणी

Mumbai news : मुंबई, महाराष्ट्र मिरर: मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असतानाही सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला. निवडणुकीत जरांगे यांच्या आंदोलनाचा फायदा घेतल्यानंतर सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडले असून, त्यांचे उपोषण आता सरकारसाठी ‘गळ्याचा फास’ बनल्याची टीकाही राऊत यांनी केली. “सरकारच्या मते जरांगे पाटील यांचा उपयोग संपला आहे. त्यांच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही, हे अमानुष आहे. सरकारमधील कोणीतरी त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. त्यातून पुढे काय मार्ग निघतो, हा वेगळा प्रश्न आहे,” असे राऊत म्हणाले.https://maharashtramirror.com/ Mumbai news

अजित पवार भाजपसोबत मजबुरीने गेले

राष्ट्रवादी काँग्रेसबाबत बोलताना राऊत म्हणाले की, अजित पवार यांचा पक्ष भाजपसोबत असला तरी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच आहे. “राष्ट्रवादीची स्थापना शरद पवार यांनी केली. अजित पवार काही मजबुरीमुळे भाजपसोबत गेले. मात्र, विलीनीकरणाचा निर्णय एका बाजूने होऊ शकत नाही,” असे त्यांनी सांगितले.https://maharashtramirror.com/ Mumbai news

नार्वेकरांवरही निशाणा

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पक्षांतरबंदी कायद्यावर बोलू नये, अशी टीका राऊत यांनी केली. शिवसेनेबाबत त्यांनी दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या तोंडी पक्षांतरबंदी कायद्याची भाषा शोभत नसल्याचे राऊत म्हणाले. दरम्यान, गरबा-दांडियामध्ये मुस्लिमांच्या सहभागावरून सुरू असलेल्या वादावरही राऊत यांनी भाजपवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशातील मुस्लिम राष्ट्रप्रमुखांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवतात, मग देशात धार्मिक भेदभाव का केला जातो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर बोलताना हे चिन्ह घरोघरी पोहोचवण्याचे काम आम्ही केले असून, या प्रकरणाचा निकाल तातडीने लागायला हवा होता, असेही राऊत म्हणाले.https://maharashtramirror.com/ Mumbai news

શેર કરો