Sanjay Raut : महाराष्ट्र आर्थिक संकटात: ‘लाडकी बहिण’ योजनेला निधी नाही – संजय राऊत यांचा आरोप
नीती आयोगाच्या बैठकीपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांचा गंभीर सवाल
1 મિનિટ વાંચન

नीती आयोगाच्या बैठकीपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांचा गंभीर सवाल
‘तिरंगा यात्रा’ आणि ‘सिंदूर’ राजकारणावर केंद्र सरकारवर सडकून टीका
मुंबई :- नीती आयोगाच्या आगामी बैठकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारच्या आर्थिक धोरणावर तसेच केंद्र सरकारच्या राजकारणावर घणाघात केला. महाराष्ट्र आर्थिक तंगीच्या गर्तेत अडकला असून ‘लाडकी बहिण’ योजना आणि इतर कल्याणकारी योजनांसाठी सरकारकडे पुरेसा निधी नसल्याचा आरोप त्यांनी केला.
पत्रकार परिषदमध्ये बोलताना राऊत म्हणाले, “नीती आयोगाच्या बैठकीत देशाच्या विकासावर चर्चा होते, तसंच राज्यांच्या बॅकलॉगबाबतही चर्चा होते. महाराष्ट्रालाही बॅकलॉग आहे. सरकारने या बैठकांमधून राज्यासाठी अधिकाधिक निधी मिळवण्याचे प्रयत्न करावेत. सध्या परिस्थिती अशी आहे की लोककल्याणकारी योजनांसाठीसुद्धा सरकारकडे पैसे नाहीत.”
राजकारणावर सडकून टीका
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भाजपाकडून काढण्यात आलेल्या ‘तिरंगा यात्रा’वरही राऊत यांनी टीका केली. “पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आमच्या 26 भगिनींचा सिंदूर पुसला गेला. तेव्हा राजकारण नको, असं सांगणारेच आता तिरंगा यात्रांच्या माध्यमातून राजकारण करत आहेत. तिरंगा केवळ भाजपाचा नाही, तो संपूर्ण देशाचा आहे. जर खरंच सिंदूराचं दु:ख असेल, तर गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी यात्रा काढा,” असा टोला त्यांनी लगावला.
हेही वाचा: Mumbai Crime News : मलकापुर पीआरएसवर दलालीचा पर्दाफाश; दोन जण अटकेत, लाखोंच्या बोगस तिकीटांची उकल
