Mumbai News : हरदीप सिंग पुरी आणि जेफ्री एपस्टीन प्रकरणावरून संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल!
Mumbai News :मुंबई :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी आणि वादग्रस्त व्यक्ती जेफ्री एपस्टीन यांच्या कथित भेटीवरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
1 મિનિટ વાંચન

Mumbai News : ही तर फक्त सुरुवात, सत्ता बदलात अनेक विकेट्स पडणार"; खासगी फोटोंवरून राजकीय वर्तुळात खळबळ
Mumbai News :मुंबई :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी आणि वादग्रस्त व्यक्ती जेफ्री एपस्टीन यांच्या कथित भेटीवरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर दोघांचे काही खाजगी फोटो समोर आल्यानंतर या प्रकरणाने राष्ट्रीय राजकारणात तीव्र नवे वळण घेतले आहे. या फोटोंमुळे केंद्रीय मंत्र्यांचे पितळ उघडे पडले असून आगामी काळात देशात मोठ्या प्रमाणावर सत्ता बदल (रेजिम चेंज) होईल आणि अनेक बड्या नेत्यांच्या विकेट्स पडतील, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news
केंद्रीय मंत्र्यांच्या स्पष्टीकरणावर गंभीर प्रश्नचिन्ह
याआधी हरदीप सिंग पुरी यांनी आपण एपस्टीनला कधीही भेटलो नसल्याचे किंवा केवळ शिष्टमंडळाचा भाग म्हणून मोजक्याच वेळा भेटल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, आता अमेरिकेच्या न्याय विभागाकडून आणि सोशल मीडियावर जे खाजगी फोटो समोर आले आहेत, त्यात दोघे एकाच ठिकाणी दिसत असल्याचा दावा केला जात आहे. या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी आक्रमक होत, पुरी हे एपस्टीनला नेमके कोणाच्या निरोप घेऊन भेटत होते? असा सवाल उपस्थित केला आहे. या सर्व घटनाक्रमामुळे सत्ताधारी पक्षावर विरोधकांकडून नैतिक दबाब वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आगामी राजकीय भूकंपाचे संकेत आणि अमेरिकेच्या दौऱ्याची चर्चा
एका बाजूला अमेरिकेचे उच्च अधिकारी किंवा परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर येत असताना आणि दुसरीकडे अशा संवेदनशील फाईल्स आणि छायाचित्रे समोर येत असल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चलबिचल सुरू आहे. संजय राऊत यांनी या प्रकरणाला 'सुरुवात' म्हटले असून, एपस्टीन फाईल्स आणि संबंधित पुराव्यांमुळे आगामी काळात देशाच्या राजकारणात मोठा भूकंप येऊ शकतो, असा सूचक इशारा दिला आहे. या प्रकरणामुळे आता सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा कलह पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
