chhatrapati sambhaji nagar : जरांगेंवर टीका करणारे जाधव आता रुग्णालयात; भेटीमागे डॅमेज कंट्रोलची चर्चा!
chhatrapati sambhaji nagar : छत्रपती संभाजीनगर : अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू असताना खासदार संजय जाधव आणि जरांगे पाटील यांच्यातील वाद चांगलाच पेटला होता.
1 મિનિટ વાંચન

chhatrapati sambhaji nagar : छत्रपती संभाजीनगर : अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू असताना खासदार संजय जाधव आणि जरांगे पाटील यांच्यातील वाद चांगलाच पेटला होता. जरांगे पाटील यांनी स्वतः जाधव यांना फोन करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणारा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून तो ऐनवेळी रद्द करता येणार नाही, अशी भूमिका संजय जाधव यांनी घेतली होती.https://maharashtramirror.com/ chhatrapati sambhaji nagar
यानंतर जरांगे पाटील यांनी जाधव यांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली होती. मराठा समाजाच्या आंदोलनाच्या काळात सत्ताधाऱ्यांचा कार्यक्रम घेण्यावरून त्यांनी जाधव यांना इशाराही दिला होता. अखेर जाधव यांच्या भूमिकेनंतरही परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.https://maharashtramirror.com/ chhatrapati sambhaji nagar
मनोज जरांगेंसाठी प्रार्थना
आता मात्र परिस्थिती बदलली आहे. जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केल्यानंतर त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी खासदार संजय जाधव यांनी थेट रुग्णालयात जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत काळजी घेण्याचा आग्रह केला. तसेच, मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या मनोजदादांना आई तुळजाभवानी मातेच्या कृपेने लवकर पूर्ण आरोग्य लाभावं, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
मात्र या भेटीमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. कारण काही दिवसांपूर्वीच जरांगे पाटील यांच्या सूचनेनंतरही जाधव यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेतला होता. त्यातच दुष्काळ आढावा बैठकीदरम्यान जाधव काजू-बदाम खातानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर टीकाही झाली होती. या पार्श्वभूमीवर जरांगेंची रुग्णालयात जाऊन घेतलेली भेट म्हणजे डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न आहे का?, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
एकीकडे जरांगेंच्या आंदोलनाच्या काळात घेतलेली आक्रमक भूमिका आणि दुसरीकडे काही दिवसांतच रुग्णालयात जाऊन केलेली भेट या दोन्ही घटनांमुळे संजय जाधव यांच्या भूमिकेची चर्चा पुन्हा एकदा रंगली.
