Pune News : गणरायाच्या आरतीसाठी सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी महाराष्ट्र मिरर कार्यालयात गणेशोत्सवानिमित्त श्री गणरायाचे घेतले दर्शन
Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर : महाराष्ट्र मिरर कार्यालयात गणेशोत्सवानिमित्त विराजमान झालेल्या श्री गणरायाच्या दर्शनासाठी सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी यांनी भेट दिली.
1 મિનિટ વાંચન

Pune News : आरतीत सहभागी होत महाराष्ट्र मिरर परिवाराला दिल्या शुभेच्छा
Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर : महाराष्ट्र मिरर कार्यालयात गणेशोत्सवानिमित्त विराजमान झालेल्या श्री गणरायाच्या दर्शनासाठी सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी गणरायाचे मनोभावे दर्शन घेत आरतीत सहभाग घेतला. महाराष्ट्र मिरर कार्यालयात भक्तिमय वातावरणात झालेल्या आरतीदरम्यान तिवारी यांनी श्री गणरायाची पूजा केली. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात आरती पार पडली. यावेळी महाराष्ट्र मिरर परिवारातील सदस्यही उपस्थित होते. गणेशोत्सव हा समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारा आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देणारा उत्सव असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. तिवारी यांनी महाराष्ट्र मिरर परिवाराला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत श्री गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. महाराष्ट्र मिरर कार्यालयातील गणेशोत्सवानिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून श्री गणरायाचे दर्शन घेतले जात असून, आरती सोहळ्यातही मान्यवरांचा सहभाग होत आहे.
