મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Mumbai news : कर्जतमधील जलविद्युत प्रकल्पावरून संदीप देशपांडेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल‘मुख्यमंत्री म्हणजे देव झाले आहेत का? ते म्हणतात ते सगळंच बरोबर कसं?’; वृक्षतोडीवरून सरकारवर टीका

Mumbai news :मुंबई : कर्जत तालुक्यात टोरेंट पॉवर कंपनीच्या प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पासाठी वृक्षतोड सुरू झाल्याने पर्यावरणप्रेमींकडून विरोध केला जात आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

कर्जतमधील जलविद्युत प्रकल्पावरून संदीप देशपांडेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
कर्जतमधील जलविद्युत प्रकल्पावरून संदीप देशपांडेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Mumbai news :मुंबई : कर्जत तालुक्यात टोरेंट पॉवर कंपनीच्या प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पासाठी वृक्षतोड सुरू झाल्याने पर्यावरणप्रेमींकडून विरोध केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याचा दावा केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते संदीप देशपांडे यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘मुख्यमंत्री म्हणजे देव झाले आहेत का? ते म्हणतात ते सगळंच बरोबर कसं?’ असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला.https://maharashtramirror.com/ Mumbai news

‘९० हजार झाडे लावण्यासाठी जागा कुठे?’


प्रकल्पाच्या पर्यावरणपूरकतेबाबत बोलताना संदीप देशपांडे यांनी वृक्षलागवडीच्या दाव्यावर आक्षेप घेतला. मुख्यमंत्री ९० हजार झाडे लावण्याचे सांगत आहेत; मात्र, ही झाडे लावण्यासाठी जागा कुठून उपलब्ध होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. केवळ वृक्षलागवडीचे आश्वासन देऊन वृक्षतोडीचे समर्थन करता येणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

‘गुजरातला फायदेशीर प्रकल्प, महाराष्ट्राच्या वाट्याला प्रदूषण?’


‘दोन गुजरात्यांसाठी हे सगळं सुरू आहे,’ अशी टीका करत देशपांडे यांनी महाराष्ट्रातील प्रकल्पांच्या धोरणावरही प्रश्न उपस्थित केले. गिफ्ट सिटीसारखे महत्त्वाचे प्रकल्प गुजरातमध्ये उभारले जातात, तर प्रदूषणकारी प्रकल्प महाराष्ट्राच्या वाट्याला येतात, हे चालणार नाही, असे ते म्हणाले.

कर्जतमधील प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पामुळे होणारी वृक्षतोड आणि त्याच्या पर्यावरणीय परिणामांबाबत प्रश्न उपस्थित होत असताना, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या पर्यावरणपूरकतेच्या दाव्यावरून राजकीय वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

શેર કરો