મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune Crime : रुपीनगर येथे निवृत्त आर्मी अधिकाऱ्याची १२ लाखांची फसवणूक

Pune Crime : पुणे: सायबर भामट्यांनी अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) अधिकारी असल्याचे भासवून एका निवृत्त आर्मी अधिकाऱ्याची फसवणूक केली.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

रुपीनगर येथे निवृत्त आर्मी अधिकाऱ्याची १२ लाखांची फसवणूक 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवली
रुपीनगर येथे निवृत्त आर्मी अधिकाऱ्याची १२ लाखांची फसवणूक 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवली

Pune Crime : डिजिटल अरेस्टची भीती दाखवली

Pune Crime : पुणे: सायबर भामट्यांनी अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) अधिकारी असल्याचे भासवून एका निवृत्त आर्मी अधिकाऱ्याची फसवणूक केली. ही घटना १ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर दरम्यान रुपीनगर येथे घडली. याप्रकरणी रामकृष्ण ज्ञान शिंदे (८५, स्पीनगर, पुणे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विविध व्हॉट्सॲप क्रमांकधारक आणि एका खाजगी कंपनीच्या बँक खात्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञातांनी फिर्यादीला व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल करून स्वतःला सरकारी तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादीला 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवून एका खाजगी बँक खात्यात पैसे पाठवण्यास भाग पाडले आणि एकूण १२ लाख रुपये उकळले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.https://maharashtramirror.com/ Pune Crime

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો