મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

नाले प्रवाहातील अडथळे दूर करा: मंजुश्री खर्डेकर

नाल्याचे पाणी कोणत्याही सोसायटीत शिरले तर आंदोलनाचा इशारा

PG
Prashik Ghaste

1 મિનિટ વાંચન

नाले प्रवाहातील अडथळे दूर करा: मंजुश्री खर्डेकर

नाल्याचे पाणी कोणत्याही सोसायटीत शिरले तर आंदोलनाचा इशारा

पुणे: नाल्याच्या प्रवाहातील अडथळे त्वरित दूर करा आणि नालेसफाईचे काम वेगाने पूर्ण करा अशा सूचना वारजे-कर्वेनगर प्रभाग समितीच्या अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. यावर्षी जर नाल्याचे पाणी कोणत्याही सोसायटी मध्ये शिरले तर जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

म्हात्रे पूल ते राजाराम पूल या डीपी रस्त्यावरून मंगेशकर रुग्णालय रस्त्याचे आणि नाल्यावर कल्वर्ट बांधण्याचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी करण्यात आली. यावेळी नगरसेवक पुनीत जोशी, नगरसेवक सुनील पांडे, क्रिएटिव्हचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, 'दीनानाथ'चे डॉ. योगेश भोपे, अभियंता अमोल साने, वारजे कर्वेनगर च्या सहायक आयुक्त अस्मिता तांबे, उपअभियंता विनायक शिंदे, कनिष्ठ अभियंता नीलाक्षी तडसे शुभम असवले, रोहन दिवटे उपस्थित होते.

શેર કરો