મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune Crime : कुख्यात आरोपी राजू जावळकर गुन्हे शाखा युनिट-२ कडून जेरबंद

Pune crime : पुणे: गेल्या २ वर्षांपासून पोलिसांना चकवा देणारा आणि मागील ३० वर्षांत १०० पेक्षा जास्त वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेला अभिलेखावरील कुख्यात गुन्हेगार राजू बाबुराव जावळकर याला पुणे शहर पोलीस गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने शिताफीने अटक केली आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

कुख्यात आरोपी राजू जावळकर गुन्हे शाखा युनिट-२ कडून जेरबंद १०० पेक्षा जास्त वाहन चोरीचे गुन्हे दाखल
कुख्यात आरोपी राजू जावळकर गुन्हे शाखा युनिट-२ कडून जेरबंद १०० पेक्षा जास्त वाहन चोरीचे गुन्हे दाखल

Pune crime : १०० पेक्षा जास्त वाहन चोरीचे गुन्हे दाखल

Pune crime : पुणे: गेल्या २ वर्षांपासून पोलिसांना चकवा देणारा आणि मागील ३० वर्षांत १०० पेक्षा जास्त वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेला अभिलेखावरील कुख्यात गुन्हेगार राजू बाबुराव जावळकर याला पुणे शहर पोलीस गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. राजू जावळकर (वय ६०, रा. डोणजे फाटा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime

गुन्हे शाखा युनिट-२ ची शिताफीने कारवाई


पुणे शहरात गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी आणि फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. यादरम्यान ८ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस अंमलदार शिवानंद कायगुडे यांना गोपनीय माहिती मिळाली की, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) खाली दाखल असलेल्या गुन्ह्यात हवा असलेला आरोपी राजू जावळकर हा डोणजे फाटा परिसरात फिरत आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime

या माहितीच्या आधारे युनिट-२ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने डोणजे परिसरात सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime

३० वर्षांचा गुन्हेगारी इतिहास


अटक करण्यात आलेला आरोपी राजू जावळकर हा सराईत वाहन चोर आहे. त्याच्यावर गेल्या ३० वर्षांत पुणे शहर, पुणे ग्रामीण, सातारा, अहिल्यानगर आणि इतर जिल्ह्यांमधील विविध पोलीस ठाण्यांत १०० पेक्षा अधिक वाहन चोरीचे गुन्हे नोंदवलेले आहेत. https://maharashtramirror.com/ Pune crime

तपास पथक


ही मोहीम अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्विनी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक अविनाश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार आणि पोलीस अंमलदार शिवानंद कायगुडे, शंकर नेवसे, सर्जेराव सरगर, योगेश मांढरे, उज्ज्वल मोकाशी, कुंदन शिंदे, महेश मंडलिक, संतोष टकले, विजय पवार, शंकर कुंभार, संदीप शिके, नागनाथ राख, ओमकार कुंभार, साधना ताम्हाणे, विद्या शिंदे व विनायक वगारे यांच्या पथकाने फत्ते केली.

શેર કરો