મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Raj Thackeray : किल्ले रायगडावर मनसेचा 20 वा वर्धापन दिन! राज ठाकरेंनी फुंकले सदस्य नोंदणीचे रणशिंग; 19 मार्चला 'शिवतीर्थावर' होणार महागर्जना

MNS Vardhapan Din 2026 : "मी स्वतःला महाराष्ट्राला अर्पण करतोय!"; 20 वर्षांपूर्वीच्या त्या ऐतिहासिक भाषणाची आठवण आणि योगायोगाची चर्चा

વ
વિવેક

2 મિનિટ વાંચન

Raj Thackeray : किल्ले रायगडावर मनसेचा 20 वा वर्धापन दिन! राज ठाकरेंनी फुंकले सदस्य नोंदणीचे रणशिंग; 19 मार्चला 'शिवतीर्थावर' होणार महागर्जना

MNS Vardhapan Din 2026 : "मी स्वतःला महाराष्ट्राला अर्पण करतोय!"; 20 वर्षांपूर्वीच्या त्या ऐतिहासिक भाषणाची आठवण आणि योगायोगाची चर्चा

किल्ले रायगड :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेला आज 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. या ऐतिहासिक टप्प्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोणत्याही बंदिस्त सभागृहात सोहळा न साजरा करता थेट दुर्गराज किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होणे पसंत केले. महाराजांच्या आशीर्वादाने रायगडाच्या पवित्र भूमीतूनच राज ठाकरेंनी मनसेच्या भव्य 'राज्यव्यापी सदस्य नोंदणी' मोहिमेचा शुभारंभ केला.

19 मार्चचा तोच 'योग' आणि शिवतीर्थाचे निमंत्रण

रायगडावरून शिवसैनिकांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी एका मोठ्या योगायोगाकडे सर्वांचे लक्ष वेधले. ते म्हणाले, "काय विलक्षण योगायोग आहे पाहा! 20 वर्षांपूर्वी मनसेची पहिली जाहीर सभा 19 मार्च 2006 रोजी झाली होती. आणि आज 20 वर्षांनंतर यंदाच्या गुढीपाडवा मेळाव्यालाही 19 मार्च हीच तारीख आली आहे." मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतरची राज ठाकरेंची ही पहिलीच जाहीर सभा असल्याने, शिवतीर्थावर ते काय बोलणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

वर्दळीच्या ठिकाणी 'मनसे स्टॉल्स'चे आदेश

राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना आक्रमकपणे सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. "केवळ शाखांमध्ये बसून राहू नका. शाळा, महाविद्यालये, मंदिरे, बाजारपेठा आणि जिथे जिथे लोकांची वर्दळ आहे, तिथे मनसेच्या सदस्य नोंदणीचे स्टॉल्स लागले पाहिजेत. अनेक लोक आहेत ज्यांना आपल्या पक्षाचे सदस्य व्हायचे आहे, त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचे आहे," असे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.

"मी स्वतःला महाराष्ट्राला अर्पण करतोय"

20 वर्षांपूर्वीच्या पहिल्या भाषणाची आठवण यावेळी ताजी झाली. 19 मार्च 2006 रोजी शिवाजी पार्कवर राज ठाकरे म्हणाले होते की, 1966 मध्ये बाळासाहेबांच्या वडिलांनी (प्रबोधनकार ठाकरे) त्यांना महाराष्ट्राला अर्पण केले होते, मात्र आज माझ्या मागे बोलायला कोणी नसले तरी मी स्वतःच स्वतःला या महाराष्ट्रासाठी अर्पण करत आहे. तीच जिद्द आणि तोच उत्साह आज 20 वर्षांनंतरही रायगडावर पाहायला मिळाला.

सभा 9 ला, गर्जना 19 ला!

वर्धापन दिन रायगडावर साजरा करण्यामागचे कारण सांगताना राज ठाकरे म्हणाले, "9 तारखेला वर्धापन दिन आणि 19 ला पाडवा मेळावा आहे. त्यामुळे जे काही सविस्तर बोलायचे आहे, ते मी 19 तारखेला शिवतीर्थावरच बोलेन. आज फक्त महाराजांचे दर्शन आणि सदस्य नोंदणीची सुरुवात करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत."

શેર કરો