મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Mumbai News : बिश्नोईला कुणाचे संरक्षण? राज ठाकरेंचा सवाल

Mumbai News :मुंबई, महाराष्ट्र मिरर : अभिनेता टायगर श्रॉफवरील हल्ला आणि त्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने कथितरीत्या स्वीकारलेली जबाबदारी यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

बिश्नोईला कुणाचे संरक्षण? राज ठाकरेंचा सवाल टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर कायदा-सुव्यवस्थेवर बोट; ‘तुरुंगातून बाहेर काढून फटकवायला पाहिजे’
बिश्नोईला कुणाचे संरक्षण? राज ठाकरेंचा सवाल टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर कायदा-सुव्यवस्थेवर बोट; ‘तुरुंगातून बाहेर काढून फटकवायला पाहिजे’

Mumbai News : टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर कायदा-सुव्यवस्थेवर बोट; ‘तुरुंगातून बाहेर काढून फटकवायला पाहिजे’

Mumbai News :मुंबई, महाराष्ट्र मिरर : अभिनेता टायगर श्रॉफवरील हल्ला आणि त्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने कथितरीत्या स्वीकारलेली जबाबदारी यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तुरुंगात असतानाही अशा घटनांची जबाबदारी स्वीकारली जात असेल तर त्यांच्यावर वचक आहे की नाही, असा सवाल करत राज ठाकरे यांनी कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर सरकारला लक्ष्य केले.https://maharashtramirror.com/Mumbai news

मुंबईतील जुहू परिसरात संध्याकाळच्या सुमारास अभिनेता टायगर श्रॉफवर हल्ला झाला होता. या घटनेत श्रॉफ बचावला, तर अन्य दोन जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. हल्ल्यानंतर काही वेळातच लॉरेन्स बिश्नोई गँगने सोशल मीडियाच्या माध्यमातून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा समोर आला होता. सलमान खानशी मैत्री असणाऱ्यांना इशारा दिल्याचेही या मजकुरात म्हटले आहे. या प्रकरणात पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला. हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन हल्लेखोरांना राजस्थानमधील कोटा येथून अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले असून, आतापर्यंत एकूण दहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

‘सुरक्षिततेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहा’

या प्रकरणाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली. “आज मला ती ओळ आठवते आहे, ‘साबरमती के संत तूने कर दिया कमाल…’,” असे म्हणत त्यांनी उपरोधिक टिप्पणी केली.

नागरिकांच्या सुरक्षिततेचा विषय गांभीर्याने हाताळला पाहिजे, असे सांगत भाजप विरोधी पक्षात असताना अशा प्रकारची घटना घडली असती तर त्यांची भूमिका काय राहिली असती, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विरोधात असताना एक आणि सत्तेत आल्यानंतर दुसरी भूमिका घेतली जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

‘मग तुम्ही त्यांना पोसत आहात का?’

गुजरातमधील साबरमती तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली. “जेलमधून बाहेर काढत त्याला फटकवायला पाहिजे. भीतीच नसेल तर मग तुम्ही त्यांना पोसत आहात का?” असा सवाल त्यांनी केला.

तुरुंगात असलेल्या व्यक्तीच्या नावाने हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली जात असल्याच्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि सुरक्षा यंत्रणेच्या भूमिकेबाबत राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. यापूर्वी खासदार संजय राऊत यांनीही बिश्नोईच्या मुद्द्यावरून सरकारवर आरोप केले होते. आता राज ठाकरे यांनीही या प्रकरणावर भाष्य केल्याने राजकीय वर्तुळात हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

શેર કરો