Rain Updates : खडकवासला धरणातून पुढील २४ तासांत विसर्ग शक्य; सतर्कतेचा इशारा
पुणे, महाराष्ट्र मिरर
3 મિનિટ વાંચન

Rain Updates : धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने पुढील २४ तासांत हा साठा ८०
पुणे, महाराष्ट्र मिरर
Rain Updates : धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातील पाण्याच्या आवकमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील २४ तासांत धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात पाणी सोडले जाण्याची शक्यता जलसंपदा विभागाने वर्तवली असून, प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांसाठी खबरदारीचा इशारा जारी केला आहे. ( Rain Updates )
Pimpri Chinchwad Rain : पूरबाधित १८८० व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर
सोमवारी (६ जुलै) दुपारी २:०० वाजेपर्यंत खडकवासला धरणात ३२ टक्के पाणीसाठा जमा झाला होता. मात्र, धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने पुढील २४ तासांत हा साठा ८० टक्के किंवा त्याहून अधिक होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पावसाचा जोर आणि पाण्याचा येणारा विसर्ग लक्षात घेऊन कोणत्याही क्षणी धरणातून पाणी सोडले जाऊ शकते. ( Rain Updates )

प्रशासनाचे नागरिकांना आवाहन:
नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी नदीपात्रात किंवा पाण्यात उतरू नये. नदीपात्रात किंवा त्याच्या आजूबाजूला असलेले साहित्य, जनावरे, वाहने किंवा शेतीचे साहित्य तातडीने सुरक्षित स्थळी हलवावे. नदीकाठच्या विशेषतः सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करावे आणि सतर्क राहावे.

जलसंपदा विभागाच्या 'निरा देवघर प्रकल्प व्यवस्थापन उपविभाग व मालमत्ता व्यवस्थापन उपविभाग, पुणे' येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी हे पत्रक प्रसिद्ध केले आहे. परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईसह पुण्याच्या घाटमाथ्याला 'रेड अलर्ट'
मुंबई महानगर प्रदेश , कोकण किनारपट्टी आणि पुण्याच्या घाटमाथ्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांसाठी पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. भारतीय हवामान विभागाने या भागांत अत्यंत मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देत 'रेड अलर्ट' जारी केला आहे. ( Rain Updates )
Alandi Flood: इंद्रायणीने ओलांडली धोक्याची पातळी; २५० वारकरी अडकले
आयएमडीचे (IMD) हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. एस. डी. सानप म्हणाले, "कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाटात गेल्या २४ ते ४८ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. पुढील दोन दिवसही हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे."
Missing Link : ‘मिसिंग लिंक’ की ‘भ्रष्टाचाराची लिंक’? पहिल्याच पावसात प्रकल्पाचे पितळ उघडे!
मुंबई आणि पुण्याच्या घाट क्षेत्रावर सध्या दाट ढग जमा झाले असून, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात हा पावसाचा जोर वाढला असल्याचे डॉ. सानप यांनी स्पष्ट केले. ( Rain Updates )
https://english.maharashtramirror.com/red-alert-mumbai-pune-ghats/
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आगामी दिवसांसाठी मुंबई, ठाणे, रायगड आणि पुण्याच्या घाट परिसरासाठी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. घाट क्षेत्रातील हा रेड अलर्ट मंगळवारीही कायम राहणार असून, राज्याच्या इतर काही भागांसाठी 'येलो अलर्ट' देण्यात आला आहे.
Missing Link : ‘मिसिंग लिंक’ की ‘भ्रष्टाचाराची लिंक’? पहिल्याच पावसात प्रकल्पाचे पितळ उघडे!
"मुंबई, पुणे आणि सभोवतालच्या घाट क्षेत्रासाठी पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे," असे आवाहन डॉ. सानप यांनी केले आहे. ( Rain Updates )
जूनमधील पावसाची तूट भरून निघाली
या पंधरवड्यातील दमदार पावसामुळे राज्याच्या पावसाच्या आकडेवारीत मोठी सुधारणा झाली आहे. डॉ. सानप यांनी सांगितले की, जूनअखेर महाराष्ट्रात तब्बल ४७ टक्के पावसाची तूट नोंदवली गेली होती. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांत झालेल्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे ही स्थिती लक्षणीयरीत्या सुधारली असून, आता ही तूट केवळ १५ टक्क्यांवर आली आहे. ( Rain Updates )
हेही वाचा: Maval : मावळ तालुक्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना; घरावर कोसळली दरड, एकाचा मृतदेह हाती
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पावसामुळे दरडी कोसळणे, पाणी साचणे आणि इतर दुर्घटना घडण्याचा धोका लक्षात घेता, हवामान विभागाने नागरिकांना अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घाट रस्ते आणि अतिवृष्टीचा इशारा दिलेल्या भागात प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक प्रशासनानेही रहिवाशांना अधिकृत हवामान अंदाजांचे अपडेट्स घेत राहण्याच्या आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. ( Rain Updates )

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
