Rain Update : खासगी कंपन्यांना 'वर्क फ्रॉम होम', तर शासकीय कार्यालयांना 'हाफ डे'
मुंबई, महाराष्ट्र मिरर
2 મિનિટ વાંચન

Rain Update : मुंबईला पावसाचा विळखा! ८०-९० किमी वेगाने वाहणार वारे; पालिका 'ॲक्शन मोड'मध्ये
मुंबई, महाराष्ट्र मिरर
Rain Update : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात वरुणराजाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. राज्याच्या विविध भागांत सुरू असलेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, राज्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मुंबई, ठाणे आणि कोकण किनारपट्टीसह रायगड जिल्ह्याला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासाठी (MMR) अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, प्रशासनाने नागरिकांना सर्वोच्च सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Rain Update red alert Mumbai)
८०-९० किमी वेगाने वादळी वारे वाहणार
राजधानी मुंबईत मध्यरात्रीपासूनच पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल रेल्वे सेवा आणि रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक सखल भागांत पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे. मुंबई-पुणे महामार्गावर घाट परिसरात दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत, तर काही ग्रामीण भागांत पुलांवरून पाणी वाहत असल्याने रस्ते वाहतूक खबरदारीचा उपाय म्हणून पूर्णपणे ठप्प करण्यात आली आहे. हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, मुंबईत केवळ मुसळधार पाऊसच नाही, तर सोसाट्याचा वाराही सुटणार असून ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.( Rain Update )
PMC News : अनधिकृत बांधकाम प्रकरणी दहा नगरसेवक रडारवर
खासगी कंपन्यांना 'वर्क फ्रॉम होम'चे निर्देश; सरकारी कर्मचाऱ्यांना 'हाफ डे'
हवामान विभागाचा हा गंभीर इशारा आणि संभाव्य धोका पाहता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तातडीची पावले उचलली आहेत. मुंबईतील परिस्थिती आणखी बिघडू नये आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ( Rain Update )
बईतील सर्व खासगी कार्यालयांना आणि कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना आज 'वर्क फ्रॉम होम' (घरून काम) देण्याचे कडक निर्देश जारी करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा (वैद्यकीय, पोलीस, अग्निशामक दल) वगळता सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना दुपारनंतर 'हाफ डे' (अर्ध्या दिवसाची सुट्टी) जाहीर करण्यात आली आहे, जेणेकरून कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचता येईल. ( Rain Update )
हेही वाचा: Alandi Flood: इंद्रायणीने ओलांडली धोक्याची पातळी; २५० वारकरी अडकले
पालिका 'ॲक्शन मोड'मध्ये; १५ हजार कर्मचारी तैनात
मुंबई महानगरपालिकेने (BMC) परिस्थिती हाताळण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू केली असून संपूर्ण यंत्रणा 'ॲक्शन मोड'मध्ये आली आहे. पालिकेने शहर आणि उपनगरात तब्बल १५ हजार कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात केली आहेत. जागोजागी पाण्याचा निचरा करण्यासाठी हाय-पॉवर पंप बसवण्यात आले आहेत. ( Rain Update )
अतिशय महत्त्वाचे किंवा तातडीचे काम असल्याशिवाय नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये. स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी. असे आवाहन पालिकेने नागरिकांना केले आहे.
Rain Update : ‘घराबाहेर पडू नका, ६ तारखेपर्यंतचे अलर्ट गांभीर्याने घ्या’
समुद्रकिनाऱ्यांवर जाण्यास सक्त मनाई
वादळी वाऱ्याचा आणि भरतीचा धोका लक्षात घेता महापालिकेने मुंबईतील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर आणि पाणथळ जागांवर नागरिकांना जाण्यास सक्त मनाई केली आहे. चौपाटी, मरीन ड्राईव्ह, गेटवे ऑफ इंडिया यांसारख्या पर्यटन स्थळांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वादळी वाऱ्याच्या वेगामुळे शहरातील जुनी झाडे उपटून पडणे, जुन्या इमारतींचे भाग कोसळणे, मोठे होर्डिंग्ज आणि विजेचे खांब पडण्याचा धोका वाढला आहे. ( Rain Update )
Ashadhi Wari 2026 : पालखी सोहळ्यानिमित्त जादा बसेसचे नियोजन
त्यामुळे नागरिकांनी अशा धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे आणि सुरक्षित आश्रय घ्यावा, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे. पुढील २४ तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून आपत्कालीन मदतीसाठी पालिकेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
