મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Railway News : पुणे विभागातील रेल्वे सेवेवर दुरूस्तीच्या कामामुळे परिणाम

पुणे, महाराष्ट्र मिरर Railway News : पुणे रेल्वे यार्डातील डीडीएस पॉइंट्सच्या श्रेणीसुधारणेच्या कामासाठी रविवारी (दि.२) सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत नऊ तासांचा विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

વઝ
વિદુલા ઝગડે

1 મિનિટ વાંચન

Railway News : पुणे विभागातील रेल्वे सेवेवर दुरूस्तीच्या कामामुळे परिणाम

रविवारी नऊ तासांचा विशेष ब्लॉक; सात गाड्या रद्द; लांब पल्ल्यांच्या मार्गात बदल

पुणे, महाराष्ट्र मिरर Railway News : पुणे रेल्वे यार्डातील डीडीएस पॉइंट्सच्या श्रेणीसुधारणेच्या कामासाठी रविवारी (दि.२) सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत नऊ तासांचा विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे पुणे रेल्वे स्थानकावरील वाहतुकीवर मोठा परिणाम होणार असून, सात गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.Railway News

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे–दौंड मार्गावरील डीडीएस पॉइंट क्रमांक २३२ आणि २२६ बदलून ६० किलो क्षमतेचे नवीन पॉइंट बसविण्यात येणार आहेत. यासाठी अभियांत्रिकी, सिग्नल, दूरसंचार आणि ओव्हरहेड उपकरणांशी संबंधित कामे केली जाणार आहेत. ब्लॉकदरम्यान पुणे यार्डाच्या दिशेने जाणारी अप मेन लाइन, प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि लाइन क्रमांक १ ते ६ वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत स्थिती आणि सुधारित वेळापत्रक तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. या कामामुळे भविष्यात रेल्वे वाहतुकीची सुरक्षितता, वेग आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत स्थिती आणि सुधारित वेळापत्रक तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. या कामामुळे भविष्यात रेल्वे वाहतुकीची सुरक्षितता, वेग आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.Railway News

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत स्थिती आणि सुधारित वेळापत्रक तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. या कामामुळे भविष्यात रेल्वे वाहतुकीची सुरक्षितता, वेग आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.Railway News

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

पुणे – तळेगाव लोकल

तळेगाव – पुणे लोकल

पुणे – लोणावळा लोकल

लोणावळा – शिवाजीनगर लोकल

मुंबई – पुणे एक्स्प्रेस

पुणे – दौंड डीईएमयू

मार्गात बदल

जयपूर–पुणे, नागपूर–पुणे, अमरावती–पुणे, जम्मू तवी–पुणे आणि सीएसएमटी–पुणे एक्स्प्रेस या गाड्या खडकी किंवा हडपसरपर्यंतच धावतील.

पुणे–जयपूर, पुणे–नागपूर, पुणे–सीएसएमटी आणि पुणे–लोणावळा या गाड्या पुणे स्थानकाऐवजी पर्यायी स्थानकांवरून सुटतील.

Railway News

શેર કરો