Sultanpur News : राहुल गांधींना मोठा दिलासा; अमित शाह मानहानी प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
Sultanpur News : सुलतानपूर : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे.
1 મિનિટ વાંચન

Sultanpur News : सुलतानपूर : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. २०१८ मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपाशी संबंधित प्रकरणात सुलतानपूर येथील एमपी-एमएलए न्यायालयाने राहुल गांधी यांची निर्दोष मुक्तता केली आहे.https://maharashtramirror.com/Sultanpur News
२०१८ मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी तत्कालीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला होता. या वक्तव्यामुळे अमित शाह यांची मानहानी झाल्याचा दावा करत विजय मिश्रा यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणाची अंतिम सुनावणी आज सुलतानपूर येथील एमपी-एमएलए न्यायालयात पार पडली. सुनावणीनंतर न्यायालयाने राहुल गांधी यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केल्याची माहिती त्यांचे वकील संतोष कुमार यांनी दिली. या निर्णयामुळे राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला असून, २०१८ मधील कथित मानहानीच्या प्रकरणाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे.
