મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : एनआयबीएम परिसरातील 'राहेजा स्टर्लिंग' सोसायटीत २० तासांहून अधिक काळ बत्तीगुल

Pune News :पुणे: शहरातील एनआयबीएम क्षेत्रातील महंमदवाडी भागातील उच्चभ्रू 'राहेजा स्टर्लिंग' सोसायटीमधील रहिवाशांना भीषण वीजसंकटाचा सामना करावा लागत आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

एनआयबीएम परिसरातील 'राहेजा स्टर्लिंग' सोसायटीत २० तासांहून अधिक काळ बत्तीगुल महावितरणच्या कारभारावर नागरिक संतप्त
एनआयबीएम परिसरातील 'राहेजा स्टर्लिंग' सोसायटीत २० तासांहून अधिक काळ बत्तीगुल महावितरणच्या कारभारावर नागरिक संतप्त

Pune News : महावितरणच्या कारभारावर नागरिक संतप्त

Pune News :पुणे: शहरातील एनआयबीएम क्षेत्रातील महंमदवाडी भागातील उच्चभ्रू 'राहेजा स्टर्लिंग' सोसायटीमधील रहिवाशांना भीषण वीजसंकटाचा सामना करावा लागत आहे. गुरुवारी रात्री ९ वाजेपासून खंडित झालेला वीजपुरवठा सलग २० तासांपेक्षा अधिक वेळ उलटूनही पूर्ववत झाला नव्हता. या दीर्घकालीन बत्तीगुलमुळे सोसायटीतील शेकडो कुटुंबांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले.https://maharashtramirror.com/ Pune News

रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री वीज गायब झाल्यानंतर महावितरणच्या हेल्पलाइनवर तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यावेळी रात्री २ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण करून वीजपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले होते. मात्र, दुसरा दिवस उजाडला तरी वीज आलेली नव्हती. महावितरणचे कर्मचारी व अधिकारी कोणतीही स्पष्ट माहिती देत नव्हते आणि दुरुस्तीबाबत टोलवाटोलवी करत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप होता..https://maharashtramirror.com/ Pune News

सतत २० तास वीज नसल्यामुळे सोसायटीतील लिफ्ट, पाण्याचा पंप आणि इन्व्हर्टर बॅकअप पूर्णपणे बंद पडले आहेत. यामुळे लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींचे हाल होत आहेत. तसेच वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इंटरनेट आणि लॅपटॉप चार्जिंगअभावी कामात मोठा अडथळा येत आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे त्रस्त झालेल्या राहेजा स्टर्लिंगमधील रहिवाशांनी महावितरणच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले आहेत. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीने वैयक्तिक लक्ष घालून वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी केली गेली. तसेच या गंभीर निष्काळजीपणाची जबाबदारी निश्चित करून संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

"बुधवारी/गुरुवारी रात्री ९ वाजेपासून वीज नाही. आम्ही हेल्पलाइन आणि अधिकाऱ्यांशी सतत संपर्क साधत आहोत, पण प्रत्येक वेळी 'दोन तासांत वीज येईल' हेच एकच उत्तर मिळते. कोणतीही स्पष्टता किंवा उत्तरदायित्व उरलेले नाही."— राज सिंग (स्थानिक रहिवासी)

"एका प्रिमियम सोसायटीमध्ये मूलभूत विजेसाठी नागरिकांना २०-२० तास संघर्ष करावा लागणे हे अत्यंत खेदजनक आहे. पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान पुढे गेले असले तरी महावितरणचा कारभार ढिसाळच आहे. या प्रकरणी कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे." — अशोक मेहेंदळे (रहिवासी)

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

શેર કરો