મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : विमाननगरमध्ये ई-सिगारेट, गांजा विक्रीचा पर्दाफाश; २२ वर्षीय तरुणी अटकेत; २ लाख १३ हजारांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : कॉस्मेटिक ज्वेलरीच्या दुकानाच्या आडून ई-सिगारेट, प्रतिबंधित हुक्का फ्लेवर आणि गांजाची विक्री सुरू असल्याचा प्रकार विमाननगर परिसरात उघडकीस आला आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

विमाननगरमध्ये ई-सिगारेट, गांजा विक्रीचा पर्दाफाश; २२ वर्षीय तरुणी अटकेत; २ लाख १३ हजारांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त
विमाननगरमध्ये ई-सिगारेट, गांजा विक्रीचा पर्दाफाश; २२ वर्षीय तरुणी अटकेत; २ लाख १३ हजारांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : कॉस्मेटिक ज्वेलरीच्या दुकानाच्या आडून ई-सिगारेट, प्रतिबंधित हुक्का फ्लेवर आणि गांजाची विक्री सुरू असल्याचा प्रकार विमाननगर परिसरात उघडकीस आला आहे. विमानतळ पोलिसांनी छापा टाकून अभिलाषा पंकज अहिरराव (वय २२, रा. विमाननगर, पुणे) या तरुणीला अटक केली आहे. या कारवाईत सुमारे २ लाख १३ हजार १०० रुपये किमतीचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 'क्लाऊड कार्टेल' या दुकानातून बेकायदेशीरपणे ई-सिगारेट, हुक्का फ्लेवर आणि गांजाची विक्री होत असल्याची माहिती पोलीस अंमलदार हरिप्रसाद पुंडे आणि लालू कऱ्हे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी विमाननगर येथील ड्रीम जॅझी इमारतीतील दुकानावर छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान दुकानातून प्रतिबंधित ई-सिगारेट, हुक्का फ्लेवर आणि गांजासह विक्रीसाठी ठेवलेले साहित्य आढळून आले. दुकान चालवणारी अभिलाषा अहिरराव ही फोनवरून ऑर्डर घेऊन संबंधित वस्तूंची विक्री करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.https://maharashtramirror.com/ Pune News

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित तरुणीने विमाननगरमधील आयटी कंपन्यांतील कर्मचारी आणि तरुण वर्गाला लक्ष्य करून ही विक्री सुरू केली होती. यापूर्वी डेक्कन परिसरात दुकान सुरू होते. मात्र, मागील महिन्यात ते बंद करून विमाननगर येथे नव्याने दुकान सुरू करण्यात आले होते.
या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा कलम ८(क), २०(४)(ii)(अ) तसेच इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक कायदा २०१९ मधील कलम ८ आणि सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महेश बोलके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रल्हाद गिते, यांच्या सूचनांप्रमाणे पोलीस उप निरीक्षक नितीन राठोड, पोलीस उप निरीक्षक हर्षल घागरे तसेच पोलीस अंमलदार हरीप्रसाद पुंडे, लालू कऱ्हे, रुपेश पिसाळ, अभय नागटिळक, राहुल जोशी, प्रणिता थोरात आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

શેર કરો