Pune Traffic : उद्या दुपारी २ वाजल्यापासून प्रमुख मार्गांवरील वाहतूक बंद
पुणे, महाराष्ट्र मिरर
2 મિનિટ વાંચન

Pune Traffic: ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत पुण्यात ११ ऑगस्ट २०२६ रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे, महाराष्ट्र मिरर
Pune Traffic : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत पुण्यात ११ ऑगस्ट २०२६ रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तिरंगा गौरव समिती, पुणे यांच्या वतीने ही रॅली काढण्यात येणार असून, रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद करून पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. Pune Traffic tiranga rally route diversion

ही रॅली फर्ग्युसन कॉलेज रोडवरील ललित महल हॉटेल चौक ते गरवारे चौक या मार्गावर होणार आहे. त्यामुळे ललित महल हॉटेल चौक, ज्ञानेश्वर महाराज पादुका चौक, तुकाराम महाराज पादुका चौक, गुडलक चौक आणि गरवारे चौक या मार्गावर वाहतुकीवर परिणाम होणार आहे. Pune Traffic
PMC Health News : महिलांसाठीच्या शंभर स्वच्छतागृहांची घोषणा कागदावरच
पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उप-आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार वाहतूक नियमनाचे आदेश जारी केले आहेत. ११ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजल्यापासून रॅली संपेपर्यंत आवश्यकतेनुसार संबंधित मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. Pune Traffic

कोणते मार्ग बंद?
१) खंडोजी बाबा चौक ते गुडलक चौक :
खंडोजी बाबा चौक ते गरवारे ब्रिज चौक हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
या मार्गावरील वाहनचालकांनी स्वारगेटकडून पुणे विद्यापीठाकडे जाताना अलका चौक, खंडोजीबाबा चौक, वीर सावरकर चौकाकडे न जाता आण्णा भाऊ साठे चौक, ना. सी. फडके चौक, मांगिरबाबा चौक, सेनादत्त चौक, बालशिवाजी, म्हात्रे पूल, नळ स्टॉप आणि लॉ कॉलेज रोड या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
स्वारगेटकडून खडकी अथवा जुन्या पुणे-मुंबई महामार्गाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी आण्णा भाऊ साठे चौक, पुरम चौक, बाजीराव रोड, गाडगीळ पुतळा, कुंभार वेस आणि आरटीओ चौक या मार्गाचा वापर करावा. Pune Traffic

२) गरवारे चौक ते चाफेकर चौक (एफ.सी. रोड) :
गरवारे चौक ते तुकाराम पादुका चौक, ज्ञानेश्वर पादुका चौक, ललित महल चौक आणि चाफेकर चौक या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी शेलारमामा चौक, प्रभात रोड, लॉ कॉलेज रोड, एस.बी. रोड, चतुःशृंगी रोड, मॉडेल कॉलनी रोडमार्गे वाहतूक वळवावी. फर्ग्युसन कॉलेज रोडवर न जाता लॉ कॉलेज रोड आणि सेनापती बापट रोडमार्गे पुढे जावे.
तसेच भांडारकर रोड, बीएमसीसी रोड, चतुःशृंगी रोड आणि मॉडेल कॉलनी रोड या मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. Pune Traffic
Pune Police : महाराष्ट्रातील २२ पोलीस अधिकारी ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकाने’ सन्मानित
पुणे वाहतूक पोलिसांनी नागरिकांनी शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिस कर्मचारी व मदतनीसांना सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
डॉ. संदीप भाजीभाकरे, पोलीस उप-आयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर यांनी संबंधित वाहतूक नियमनाबाबत आदेश जारी केले आहेत.
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
