Pune News : वाहतूक व्यवस्थेत होणार नवे 'प्रायोगिक' बदल
Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर : शहरातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित व सुरळीत करण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेने सिंहगड रोड, दत्तवाडी आणि मुंढवा विभागांतर्गत महत्त्वपूर्ण बदल लागू केले आहेत.
2 મિનિટ વાંચન

Pune News : सिंहगड रोड, दत्तवाडी व मुंढवा विभागांमध्ये अंमलबजावणी

Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर : शहरातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित व सुरळीत करण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेने सिंहगड रोड, दत्तवाडी आणि मुंढवा विभागांतर्गत महत्त्वपूर्ण बदल लागू केले आहेत. वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News
असे असतील नवे बदल
१. भूमकर चौक व स्वामी नारायण मंदिर परिसर (सिंहगड रोड विभाग) : भूमकर चौकाजवळ असलेल्या स्वामी नारायण मंदिरात ये-जा करणाऱ्या भाविकांच्या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News
• भूमकर चौक सर्विस रोडवरून (सातारा लेन) स्वामी नारायण मंदिराकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हा रस्ता फक्त जाण्याकरिता एकेरी मार्ग (वन वे ) करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
• मंदिराकडून भूमकर चौकाकडे (मुंबई लेन) जाण्यासाठी मंदिराच्या डाव्या बाजूने जाणारा सेवा रस्ता एकेरी मार्ग राहील.
• मंदिरासमोरील कनेक्टिंग पुलावरून फक्त भूमकर चौकाकडून मंदिराकडे जाणाऱ्या वाहनांनाच प्रवेश दिला जाईल. मंदिराकडून येणाऱ्या वाहनांना पुलावर प्रवेश नसेल; त्यांनी डाव्या बाजूच्या सर्व्हिस रोडचा (एकेरी मार्ग) वापर करावा.https://maharashtramirror.com/ Pune News
२. एस.पी.एम. पब्लिक इंग्लिश मिडीअम स्कूल परिसर (दत्तवाडी विभाग) : सदाशिव पेठ येथील एस.पी.एम. स्कूलसमोर अस्ताव्यस्त पार्किंगमुळे होणारी कोंडी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन बदल करण्यात आले आहेत.
• शाळेसमोरील रस्त्यावर ५० मीटर अंतरापर्यंत पी-१ आणि पी-२ (सम-विषम तारीख) पार्किंग पद्धत लागू करण्यात येत आहे. यामुळे शाळा सुटताना व भरताना होणारी कोंडी टळेल तसेच आपत्कालीन वाहनांची (रुग्णवाहिका, अग्निशामक दल) अडचण होणार नाही.
३. नॉर्थ मेन रोड – लेन नं. ७ ते ताडीगुप्ता परिसर (मुंढवा विभाग): नॉर्थ मेन रोडवर एबीसी फार्म चौकाकडून येणाऱ्या वाहतुकीचा वेग मंदावून होणारी कोंडी टाळण्यासाठी दोन प्रमुख राईट टर्न बंद करण्यात आले आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News
• आर्मी गेट येथील 'राईट टर्न' पंक्चर पॉईंट पूर्णपणे बंद करण्यात येत आहे.
• मॅरिअट सुट येथील 'राईट टर्न' पंक्चर पॉईंट बंद करण्यात येत आहे.
नागरिकांकडून मागवल्या सूचना व हरकती
वरील सर्व बदल प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात येत असून नागरिकांना या बदलांबाबत काही सूचना किंवा हरकती नोंदवायच्या असल्यास त्यांनी ७ सप्टेंबर २०२६ ते २१ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला क्र. ६, येरवडा पोस्ट ऑफिसजवळ, विमानतळ रस्ता, पुणे या कार्यालयात लेखी स्वरूपात सादर कराव्यात. प्राप्त सूचना व हरकतींचा विचार करून, तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून अंतिम आदेश निर्गमित केले जातील, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
