મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : पुण्यातील बेसुमार डोंगरकटाई, अनधिकृत बांधकामांविरुद्ध इशारा

Pune News : महत्वाचे मुद्दे *कोथरूडमधील सुतारदरा परिसरातील टेकडीवर अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात जमीन सपाटीकरण *स्थानिकांनी कडाडून विरोध केल्यावर पुणे महानगरपालिकेने हे काम थांबवले *नोटीस 'कोऱ्या कागदावर' दिल्याने प्रशासनाच्या हेतूवर आणि कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह *'यापुढे खोदाई करू नये' एवढाच उल्लेख

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

3 મિનિટ વાંચન

पुण्यातील बेसुमार डोंगरकटाई, अनधिकृत बांधकामांविरुद्ध इशारा
पुण्यातील बेसुमार डोंगरकटाई, अनधिकृत बांधकामांविरुद्ध इशारा

Pune News : महापालिकेचा अजब कारभार! वेताळ टेकडीवरील अनधिकृत खोदकाम प्रकरणी मालकाला ‘कोऱ्या कागदावर’ नोटीस; टेकड्यांच्या संरक्षणासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत अन्यथा लोकआंदोलन करण्यात येईल: माजी महापौर वंदना चव्हाण

Pune News : महत्वाचे मुद्दे
*कोथरूडमधील सुतारदरा परिसरातील टेकडीवर अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात जमीन सपाटीकरण
*स्थानिकांनी कडाडून विरोध केल्यावर पुणे महानगरपालिकेने हे काम थांबवले
*नोटीस 'कोऱ्या कागदावर' दिल्याने प्रशासनाच्या हेतूवर आणि कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह
*'यापुढे खोदाई करू नये' एवढाच उल्लेख करून पालिकेने आपली जबाबदारी झटकलीhttps://maharashtramirror.com/ Pune News

Pune News : पुणे: पुण्याची हिरवी फुफ्फुसे मानल्या जाणाऱ्या वेताळ टेकडीचे अस्तित्व पुन्हा एकदा संकटात सापडले आहे. कोथरूडमधील सुतारदरा परिसरातील टेकडीवर जेसीबीच्या साहाय्याने अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात खोदाई करून जमीन सपाटीकरणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिकांनी याविरोधात कडाडून विरोध दर्शवल्यानंतर पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) अखेर हे काम थांबवले खरे, मात्र जागेच्या मालकाला बजावलेली नोटीस एका 'कोऱ्या कागदावर' दिल्याचे समोर आल्याने प्रशासनाच्या हेतूवर आणि कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

शहरातील विविध टेकड्यांवर सुरू असलेल्या बेसुमार डोंगरकटाई, अनधिकृत बांधकामे आणि खोदकामाच्या प्रकारांविरोधात माजी खासदार वंदना चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे. शहरातील टेकड्यांचे नुकसान तातडीने रोखावे, अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा सज्जड इशारा त्यांनी पुणे महापालिका प्रशासनाला दिला आहे..https://maharashtramirror.com/ Pune News

या पार्श्वभूमीवर, वंदना चव्हाण यांनी सोमवारी पुणे महानगरपालिकेत जाऊन आयुक्त आणि शहर अभियंता यांची प्रत्यक्ष भेट घेतली व टेकड्यांच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आणला. सुतारदरा, तळजाई, कात्रज, गंगाधाम आणि बाणेर परिसरासह सिंहगड रस्ता, कोंढवा व बिबेवाडी परिसरातील टेकड्यांच्या संरक्षणासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

पुणे शहराच्या पर्यावरणीय समतोलात टेकड्यांचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शहरातील जैवविविधता टिकवणे, पावसाच्या पाण्याचे जमिनीत मुरणे, नैसर्गिक जलप्रवाह सुरळीत राहणे आणि शहराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी या टेकड्या फुफ्फुसाचे काम करतात. मात्र, शहराच्या विविध भागांत टेकड्यांवरील खोदकाम, उतारावरील फेरबदल आणि विकासकामांबाबत वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत.

या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने केवळ तक्रारींची साधी दखल न घेता प्रत्यक्ष पाहणी करावी, परवानग्यांची कठोर पडताळणी करावी आणि नियमबाह्य काम करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षा वंदना चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. विकासाला विरोध करणाऱ्यांना विरोध करताना त्यांनी स्पष्ट केले की,निसर्गाचा विनाश रोखणे हा कोणाचाही विकासविरोध नसून ती मानवाच्या अस्तित्वाची लढाई आहे.

प्रशासनिक अनास्था आणि कायदेशीर तरतुदींची पायमल्ली
विशेष म्हणजे, अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमात स्पष्ट तरतुदी असतानाही महापालिका आणि महसूल प्रशासनाकडून प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते. विशेषतः सुट्ट्यांच्या दिवशी किंवा रात्रीच्या वेळी ही कामे केली जातात. संबंधित ठिकाणांची पाहणी, परवानग्यांची माहिती, आजवर केलेली कारवाई आणि जबाबदार अधिकाऱ्यांची निश्चिती करणे आवश्यक आहे. डोंगरकटाई पुन्हा होणार नाही यासाठी कायमस्वरूपी देखरेख यंत्रणा उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

नेमकं काय घडलं?
कोथरूडच्या सुतारदरा परिसरातील सर्व्हे क्रमांक ११३ मध्ये 'बायोडायव्हर्सिटी पार्क' आणि 'हिलटॉप-हिलस्लोप'चे आरक्षण आहे. या संवेदनशील जागेवर एका बांधकाम व्यावसायिकाकडून महापालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अवजड यंत्रसामग्रीच्या माध्यमातून डोंगरकटाई सुरू होती. टेकडीचे लचके तोडले जात असल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी आणि पर्यावरणप्रेमींनी तात्काळ आवाज उठवला. वाढता दबाव पाहता महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी १ नोव्हेंबर रोजी घटनास्थळी धाव घेऊन काम थांबवले आणि संबंधितांना नोटीस बजावली.

नोटीस की प्रशासकीय बनाव?
महापालिकेने काम थांबवण्याचे श्रेय घेतले असले, तरी त्यांनी जारी केलेल्या नोटिशीच्या स्वरूपामुळे प्रशासनाचा निष्काळजीपणा उघडा पडला आहे. बजावलेल्या नोटिशीवर महापालिकेचे अधिकृत बोधचिन्ह नाही, जावक क्रमांक नाही आणि आवक नोंदीचा कोणताही तपशील नाही.

कोऱ्या कागदावर केवळ कनिष्ठ अभियंत्याची स्वाक्षरी करून ही नोटीस धाडण्यात आली आहे. भविष्यात या बेकायदेशीर कामावर कायदेशीर कारवाई करण्याची वेळ आल्यास न्यायालयासमोर या 'अधिकृत नसलेल्या' नोटिशीचा आधार काय असणार? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. पर्यावरणप्रेमींच्या मते, केवळ "यापुढे खोदाई करू नये" एवढाच उल्लेख करून पालिकेने आपली जबाबदारी झटकली आहे. प्रत्यक्षात टेकडीचे आत्तापर्यंत झालेले नुकसान, अनधिकृत खोदाई करणारा मुख्य सूत्रधार आणि त्याच्यावर कठोर दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई का नाही, याबाबत प्रशासन मौन बाळगून आहे.

अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी
पुण्यात बाणेर, बिबवेवाडी, सुतारदरा, वेताळ टेकडी, कोंढवा आणि सिंहगड रस्ता अशा अनेक भागात डोंगरकटाईचे सत्र सर्रास सुरू आहे. महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर केवळ काम थांबवण्याचे नाटक केले जाते आणि काही दिवसांनी ते पुन्हा पूर्ववत सुरू होते, असा अनुभव नागरिकांना येत आहे.

या गंभीर समस्येची दखल घेत माजी खासदार वंदना चव्हाण यांनी महापौर मंजूषा नागपुरे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले. शहरातील टेकड्या फोडल्यामुळे जैवविविधता धोक्यात आली असून, अनधिकृत खोदाईकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि अशा थातूरमातूर नोटिसा बजावणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.पर्यावरण रक्षणार्थ वेताळ टेकडी वाचवण्यासाठी आता नागरिक आणि विविध पर्यावरण संस्था आक्रमक झाल्या असून महापालिका याप्रकरणी ठोस कारवाई करणार की कागदी घोडेच नाचवणार, याकडे सर्व पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

શેર કરો