મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune news :शेवाळयुक्त खड्ड्यातून टँकरद्वारे पाणी उपसा

Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर : हडपसर येथील प्रसिद्ध सिझन्स मॉल परिसरातील साचलेल्या पाण्याच्या खड्ड्यातून सर्रासपणे पाण्याचे टँकर भरले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

शेवाळयुक्त खड्ड्यातून टँकरद्वारे पाणी उपसा
शेवाळयुक्त खड्ड्यातून टँकरद्वारे पाणी उपसा

Pune news : गंभीर आजारांचा प्रादुर्भाव होण्याची भीती

Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर : हडपसर येथील प्रसिद्ध सिझन्स मॉल परिसरातील साचलेल्या पाण्याच्या खड्ड्यातून सर्रासपणे पाण्याचे टँकर भरले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका प्रत्यक्षदर्शी नागरिकाने सोशल मीडियावर याचे फोटो शेअर संताप व्यक्त केला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

सोसायट्यांना दूषित पाण्याचा पुरवठा ?


शेवाळलेल्या आणि दूषित दिसणाऱ्या या खड्ड्यात थेट पाइप लावून टँकर भरले जात असल्याचे समोर आलेल्या फोटोंमध्ये स्पष्ट दिसत आहे. हेच दूषित पाणी जवळील निवासी सोसायट्यांना पुरवले जात आहे का, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित झाला असून स्थानिक रहिवाशांमध्ये घबराटीचे व संतापाचे वातावरण पसरले आहे.
उन्हाळा व ऐन सणासुदीच्या काळात शहरात पाण्याची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत अस्वच्छ आणि शेवाळयुक्त पाण्याच्या खड्ड्यातून पाणी उपसून ते नागरिकांना पुरवले जात असल्यास काविळ, गॅस्ट्रो, विषबाधा व त्वचेच्या आजारांसारख्या गंभीर आजारांचा प्रादुर्भाव होण्याची मोठी भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभाग आणि आरोग्य विभागाकडे बंधित टँकर चालक हे पाणी कुठे घेऊन जात आहेत आणि कोणत्या कारणासाठी (बांधकाम की पिण्यासाठी) वापरत आहेत? याची चौकशी करावी तसेच, जर हे पाणी कोणत्याही निवासी इमारतीत पुरवले गेले असेल, तर ते त्वरित रोखून संबंधित टँकर कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी येथील स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
या प्रकरणी पुणे महापालिका व संबंधित भागातील आरोग्य अधिकारी काय पावले उचलतात, याकडे हडपसर-मगरपट्टा परिसरातील सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો