Pune News : संगम पुलावरून व्यक्ती नदीत पडल्याची घटना; शोधकार्य सुरू
Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर : संगम पुलाजवळ आरटीओनजीक असलेल्या रेल्वे पुलावरून एक व्यक्ती खाली पाण्यात पडल्याची घटना काल रात्री घडली.
1 મિનિટ વાંચન

Pune News : अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी; बोटीच्या साह्याने शोध, अद्याप व्यक्तीचा ठावठिकाणा नाही
Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर : संगम पुलाजवळ आरटीओनजीक असलेल्या रेल्वे पुलावरून एक व्यक्ती खाली पाण्यात पडल्याची घटना काल रात्री घडली. घटनेची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले.https://maharashtramirror.com/ Pune News
अग्निशमन दलाची तीन वाहने घटनास्थळी दाखल झाली. जवानांनी बोटीच्या साह्याने पाण्यात संबंधित व्यक्तीचा शोध घेतला. मात्र, शोधकार्यादरम्यान अद्याप संबंधित व्यक्ती आढळून आलेली नाही.https://maharashtramirror.com/ Pune News
पाण्यात पडलेली व्यक्ती कोण आहे आणि ती नेमकी कोणत्या परिस्थितीत पुलावरून खाली पडली, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. उपलब्ध माहितीनुसार अग्निशमन दलाकडून शोधकार्य करण्यात येत आहे.
