Pune News : शासकीय सुट्ट्यांच्या दिवशीही आरटीओचे कामकाज सुरू; स्कूल बसच्या 'फिटनेस प्रमाणपत्रा'साठी मौजे दिवे येथे विशेष सोय
Pune News : पुणे: शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करता पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे.
1 મિનિટ વાંચન

Pune News : पुणे: शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करता पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी शनिवार, १२ सप्टेंबर आणि रविवार, १३ सप्टेंबर २०२६ या दोन्ही शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी मौजे दिवे येथील आरटीओ कार्यालय पूर्ण वेळ सुरू ठेवण्यात येणार आहे.
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि व्हॅन या वाहनांची तांत्रिक तपासणी करून योग्यता प्रमाणपत्र मिळवणे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असते. मात्र, आठवड्याच्या इतर दिवशी शाळा सुरू असल्याने किंवा इतर कामांमुळे बस चालक-मालकांना वाहने तपासणीसाठी आणण्यात अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन वाहनचालक, मालक आणि संघटनांच्या सोयीसाठी आरटीओने सुट्टीच्या दिवशीही कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप खडसे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, या दोन दिवसांत मौजे दिवे येथील कार्यालयात विशेषतः स्कूल बस आणि स्कूल व्हॅनच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाच्या कामाला प्रथम प्राधान्य दिले जाईल.https://maharashtramirror.com/ Pune News
आरटीओचे वाहनचालकांना आवाहन:
पुणे जिल्ह्यातील सर्व स्कूल बस/व्हॅन चालक, मालक व संबंधित संघटनांनी आपल्या वाहनांची वेळेत तपासणी करून योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करून घ्यावे आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरटीओ प्रशासनाने केले आहे.
