મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : पुणे आरटीओतर्फे चारचाकी वाहनांसाठी 'MH 61' नवीन मालिका सुरू; पसंतीच्या क्रमांकांसाठी अर्ज व लिलावाचे वेळापत्रक जाहीर

Pune News : पुणे: प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), पुणे येथे चारचाकी वाहनांसाठी 'MH 61' ही नवीन नोंदणी मालिका (उदा.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

पुणे आरटीओतर्फे चारचाकी वाहनांसाठी 'MH 61' नवीन मालिका सुरू; पसंतीच्या क्रमांकांसाठी अर्ज व लिलावाचे वेळापत्रक जाहीर
पुणे आरटीओतर्फे चारचाकी वाहनांसाठी 'MH 61' नवीन मालिका सुरू; पसंतीच्या क्रमांकांसाठी अर्ज व लिलावाचे वेळापत्रक जाहीर

Pune News : पुणे: प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), पुणे येथे चारचाकी वाहनांसाठी 'MH 61' ही नवीन नोंदणी मालिका (उदा. MH61 F0001) लवकरच सुरू होत आहे. या मालिकेतील आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक मिळवण्यासाठी वाहनधारकांकडून अर्ज मागवण्यात आले असून लिलावाची प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
नागरिकांना सोयीस्करपणे व विनात्रास पसंतीचा क्रमांक मिळावा, यासाठी इच्छुक वाहनधारकांनी ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी २:३० या वेळेत आरटीओच्या नवीन नोंदणी विभागात अर्ज सादर करायचा आहे. अर्जासोबत नॅशनल/शेड्युल्ड बँकेचा "R.T.O., Pune" या नावाने काढलेला एक महिन्यापेक्षा जुना नसलेला डी.डी. (DD), पत्त्याचा पुरावा (वीज बिल, टेलिफोन बिल), पॅन कार्ड आणि ओळखपत्र जोडणे अनिवार्य आहे. तसेच अर्जासोबत ओळखपत्र किंवा भाडे करारनामा (Rent Agreement) जोडणे आवश्यक असून, त्यावरील माहितीनुसारच क्रमांकाची पावती दिली जाईल.https://maharashtramirror.com/ Pune News
एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३:१५ वाजेपर्यंत लिलावासाठी सीलबंद लिफाफ्यात जादा रक्कमेचा (किमान रु. ३०१ पेक्षा जास्त) डी.डी. जमा करावा लागेल. त्याच दिवशी दुपारी ४:०० वाजता सहकार सभागृह, आरटीओ पुणे येथे पात्र अर्जदारांच्या उपस्थितीत लिफाफे उघडून सर्वाधिक रक्कमेचा डी.डी. देणाऱ्या अर्जदाराला तो क्रमांक दिला जाईल. समान रक्कमेचे डी.डी. आल्यास चिठ्ठी टाकून निर्णय घेतला जाईल.
महत्त्वाच्या अटी व सूचना:
• अर्जदार आरटीओ पुणेच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे; बाहेरील अर्ज बाद केले जातील.
• लिलावात क्रमांक न मिळालेल्या अर्जदारांनी आपला मूळ डी.डी. ७ दिवसांच्या आत कार्यालयातून परत घ्यावा.
• राखून ठेवलेल्या पसंतीच्या क्रमांकाची वैधता १८० दिवस (६ महिने) असेल. या कालावधीत नोंदणी न झाल्यास शुल्क जप्त होईल आणि तो क्रमांक पुन्हा सर्वसामान्यांसाठी पोर्टलवर उपलब्ध होईल.
• लिलाव प्रक्रियेनंतर उर्वरित पसंती क्रमांकांचे वितरण ऑनलाईन पद्धतीने सुरू केले जाईल.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો