Pune News : आरटीओ चौकात ट्रकची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर
Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर : भरधाव आयशर ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ३४ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर त्याची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले.
1 મિનિટ વાંચન

Pune News : अपघातानंतर आयशर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार
Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर : भरधाव आयशर ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ३४ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर त्याची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले. आरटीओ चौकासमोर बुधवारी (दि. १७) पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळी न थांबता पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.https://maharashtramirror.com/ pune News
याप्रकरणी मृताचे भाऊ सुभाष रामजी गावीत (वय ३२, मूळ रा. चापापाडा, ता. बागलाण, जि. नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. बंडगार्डन पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), १२५(ब), २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १३४(अ), १३४(ब), ११९/१७७ अन्वये ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलाब रामजी गावीत (वय ३४, रा. वैदवाडी, हडपसर) हे पत्नी आणि मुलासह दुचाकीवरून जात होते. आरटीओ चौकासमोर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आयशर ट्रक (एमएच ४२ बीएफ ३०७७) ने जोरदार धडक दिली. ट्रकचालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून हयगयीने आणि भरधाव वेगात वाहन चालविल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या अपघातात गुलाब गावीत गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी आणि मुलगाही गंभीर जखमी झाला. अपघात झाल्यानंतर चालकाने वाहन थांबवून जखमींना मदत केली नाही तसेच अपघाताची माहिती न देता तो घटनास्थळावरून निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ट्रकचालकाला अद्याप अटक झालेली नसून, पोलिस उपनिरीक्षक गणेश वानखडे पुढील तपास करीत आहेत.
