Pune News : ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी दिलासा: पुणे आरटीओकडून परवाना व वाहन बदली मुदतीत वाढ
Pune News पुणे:मिरर : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती कार्यक्षेत्रातील ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे.
1 મિનિટ વાંચન

Pune News पुणे:मिरर : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती कार्यक्षेत्रातील ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. प्राधिकरणाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत जनहिताचा विचार करून ऑटोरिक्षा/टॅक्सीच्या इरादापत्रांची (एलओआय) मुदतवाढ आणि वाहन बदली (रिप्लेसमेंट) प्रक्रियेबाबत विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News
प्रमुख निर्णय व सवलती:
१. इरादापत्र (एलओआय) मुदतवाढ: नव्याने ऑटोरिक्षा परवाने वाटप बंद असल्याने, ज्या इरादापत्रांची १८० दिवसांची मुदत १ जानेवारी २०२६ किंवा त्यानंतर संपली आहे, अशा अर्जदारांनी ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी अर्ज केल्यास त्यांना एकवेळ १८० दिवसांची मुदतवाढ दिली जाईल. तसेच ९ मार्च २०२६ पर्यंत नोंदणीसाठी अर्ज सादर केलेल्या चालकांनाही ही मुदतवाढ लागू राहील.https://maharashtramirror.com/ Pune News
२. दंड भरून वाहन बदलीची संधी: ज्या परवानाधारकांची वाहन बदलीची मुदत ३० जून २०२६ पर्यंत संपली आहे, त्यांना प्रतिमहिना रु. १०० दंड भरून ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत बदली वाहन नोंदणी करण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे.
३. विनादंड मुदतवाढ: ज्यांची वाहन बदलीची मुदत १ जुलै २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत संपली आहे, त्यांना कोणताही दंड न आकारता ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण न केल्यास परवाने रद्द होतील.
४. नवीन वाहन बदली नियम: १ सप्टेंबर २०२६ नंतर परवाना रिप्लेसमेंट घेणाऱ्यांना ६ महिन्यांची मुदत असेल. ही मुदत संपल्यास केवळ एकदाच आणखी ६ महिन्यांची (एकूण १ वर्ष) मुदत मिळेल. त्यानंतरही वाहन नोंदणी न झाल्यास परवाना कायमचा रद्द केला जाईल.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी सर्व संबंधित चालक व मालकांनी या योजनेचा आणि मुदतवाढीचा वेळेत लाभ घेऊन आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
