મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी दिलासा: पुणे आरटीओकडून परवाना व वाहन बदली मुदतीत वाढ

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती कार्यक्षेत्रातील ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

3 મિનિટ વાંચન

ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी दिलासा: पुणे आरटीओकडून परवाना व वाहन बदली मुदतीत वाढ
ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी दिलासा: पुणे आरटीओकडून परवाना व वाहन बदली मुदतीत वाढ

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती कार्यक्षेत्रातील ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. प्राधिकरणाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत जनहिताचा विचार करून ऑटोरिक्षा/टॅक्सीच्या इरादापत्रांची (एलओआय) मुदतवाढ आणि वाहन बदली (रिप्लेसमेंट) प्रक्रियेबाबत विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News

प्रमुख निर्णय व सवलती:


१. इरादापत्र (एलओआय) मुदतवाढ: नव्याने ऑटोरिक्षा परवाने वाटप बंद असल्याने, ज्या इरादापत्रांची १८० दिवसांची मुदत १ जानेवारी २०२६ किंवा त्यानंतर संपली आहे, अशा अर्जदारांनी ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी अर्ज केल्यास त्यांना एकवेळ १८० दिवसांची मुदतवाढ दिली जाईल. तसेच ९ मार्च २०२६ पर्यंत नोंदणीसाठी अर्ज सादर केलेल्या चालकांनाही ही मुदतवाढ लागू राहील. https://maharashtramirror.com/
२. दंड भरून वाहन बदलीची संधी: ज्या परवानाधारकांची वाहन बदलीची मुदत ३० जून २०२६ पर्यंत संपली आहे, त्यांना प्रतिमहिना रु. १०० दंड भरून ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत बदली वाहन नोंदणी करण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे.
३. विनादंड मुदतवाढ: ज्यांची वाहन बदलीची मुदत १ जुलै २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत संपली आहे, त्यांना कोणताही दंड न आकारता ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण न केल्यास परवाने रद्द होतील.
४. नवीन वाहन बदली नियम: १ सप्टेंबर २०२६ नंतर परवाना रिप्लेसमेंट घेणाऱ्यांना ६ महिन्यांची मुदत असेल. ही मुदत संपल्यास केवळ एकदाच आणखी ६ महिन्यांची (एकूण १ वर्ष) मुदत मिळेल. त्यानंतरही वाहन नोंदणी न झाल्यास परवाना कायमचा रद्द केला जाईल.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी सर्व संबंधित चालक व मालकांनी या योजनेचा आणि मुदतवाढीचा वेळेत लाभ घेऊन आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
पुणे, मिरर प्रतिनिधी - गणेशोत्सव २०२६ च्या कालावधीत (१४ ते २५ सप्टेंबर २०२६) पुण्यातील मध्यवर्ती भागात देखावे व रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून रोज सायंकाळी पाच वाजल्यापासून मध्यवर्ती भागातील मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद केले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर, प्रवासी, विद्यार्थी आणि कामगारांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) स्थानकनिहाय पर्यायी मार्गांचे नियोजन जाहीर केले आहे.
प्रमुख बसमार्गांमधील महत्त्वाचे बदल:
• शिवाजी रोड व टिळक रोड: शिवाजी रोड बंद झाल्यावर स्वारगेटकडे जाणाऱ्या बसेस (उदा. २, ११, ३०, ३७, ४६ इत्यादी) जंगली महाराज रोड, बालगंधर्व, डेक्कन आणि संभाजी पुलावरून टिळक रोडमार्गे जातील. टिळक रोडही बंद झाल्यास, या बसेस शास्त्री रोड, दांडेकर पूल आणि मित्र मंडळ चौकातून पुढे जातील.
• डेक्कन व कोथरूड मार्ग: कोथरूडकडून पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या बसेसचा (८१, ९४, १०८, १४३ इत्यादी) जाण्याचा मार्ग पूर्ववत राहील. मात्र, पुणे स्टेशनवरून परतताना लक्ष्मी रोड बंद असल्यास बसेस ससून हॉस्पिटल, जुना बाजार, मनपा भवन, काँग्रेस भवन आणि बालगंधर्वमार्गे डेक्कनकडे वळवल्या जातील.
• रद्द व संक्षिप्त मार्ग: मार्ग क्र. ३ आणि ६ हे रस्ते बंद असल्याच्या काळात पूर्णपणे बंद राहतील. मार्ग क्र. ५५ च्या बसेस शनिपार/मंडई ऐवजी नटराज स्थानकावरून सुटतील, तर मार्ग क्र. ५८ आणि ५९ डेक्कन जिमखाना स्थानकावरून सोडल्या जातील.
• इतर पर्यायी मार्ग: शास्त्री रोड बंद झाल्यास मार्ग क्र. १२, ४२ आणि २९९ च्या बसेस दांडेकर पूल, सेनादत्त पोलीस चौकी आणि म्हात्रे पुलावरून कर्वे रोडने चालवल्या जातील. तसेच मार्ग क्र. १७, २५ आणि ५० या बसेस स्वारगेट/सारसबाग स्थानकावरून सुटतील.
पीएमपीएमएल चे नागरिकांना आवाहन: वाहतूक पोलिसांकडून ऐनवेळी बदल झाल्यास त्यानुसार बस संचलनात सुधारणा केली जाईल. सर्व प्रवाशांनी या पर्यायी मार्गांची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पीएमपीएमएल चे मुख्य ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) आणि जनसंपर्क अधिकाऱ्यांनी केले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો