Pune News : गणेश चतुर्थीमुळे आरटीओच्या १४ सप्टेंबरच्या अपॉइंटमेंटमध्ये बदल
Pune News : पुणे: श्री गणेश चतुर्थीनिमित्त येत्या सोमवारी (दि.१४) सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
1 મિનિટ વાંચન

Pune News : पुणे: श्री गणेश चतुर्थीनिमित्त येत्या सोमवारी (दि.१४) सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), पुणे अंतर्गत संगमब्रीज कार्यालय आणि आळंदी रोड येथील आयडीटीआर कार्यालयात ज्या अर्जदारांनी अनुज्ञप्ती (ड्रायव्हिंग लायसन्स) कामांसाठी १४ सप्टेंबरची पूर्वनियोजीत वेळ (Appointment) घेतली आहे, त्यांच्यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तनिवेदनानुसार:
• सुट्टीच्या दिवशीची सोय: सोमवारची (दि.१४) अपॉइंटमेंट असलेल्या अर्जदारांनी मंगळवारी (दि.१५) कार्यालयात उपस्थित राहून आपले कामकाज पूर्ण करून घ्यावे.https://maharashtramirror.com/ Pune News
• पर्यायी दिवसांची मुभा: ज्या अर्जदारांना मंगळवारी (दि.१५) उपस्थित राहणे शक्य नसेल, त्यांनी १५ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत कोणत्याही दिवशी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून आपले अर्ज सादर करावेत.
• अपॉइंटमेंट ग्राह्य धरली जाणार: या कालावधीत येणाऱ्या अर्जदारांची १४ सप्टेंबर २०२६ चीच अपॉइंटमेंट वैध/ग्राह्य मानली जाईल.
सारथी प्रणालीवरून अपॉइंटमेंट घेतलेल्या नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन नियोजित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
