Pune : प्रशांत जगताप, दीप्ती चौधरींसह कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
पुणे, महाराष्ट्र मिरर
1 મિનિટ વાંચન

Pune: गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यादरम्यान नीट पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध
पुणे, महाराष्ट्र मिरर
Pune : राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेतील (NEET) कथित गैरप्रकार, पेपरफुटी आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष कारवाईच्या निषेधार्थ शनिवारी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आक्रमक निदर्शने करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, पश्चिम विभाग अध्यक्षा दीप्ती चौधरी यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व युवा काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
PMC : पुणे महापालिकेच्या नव्या झाडणकाम योजनेवरून वाद पेटला!
पुणे-सातारा रस्त्यावरील मार्केटयार्ड परिसरातील उत्सव बिल्डिंग चौक येथे शनिवारी सकाळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत केंद्र सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध नोंदवला. आंदोलकांनी हातात फलक घेऊन नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.pune protest neet prashant jagtap

आंदोलनात शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि दीप्ती चौधरी यांच्या नेतृत्वाखाली युवा काँग्रेसचे अक्षय जैन, सौरभ अमराळे, प्रथमेश आडनावे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. संभाव्य तणाव लक्षात घेता प्रशासनाकडून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Pune :धनकवडीत भारती हॉस्पिटलच्या आवारातील सीमाभिंत कोसळली; ५० दुचाकी अडकल्या
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सहन करणार नाही"
"नीट परीक्षेतील गैरप्रकारामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांसाठी आवाज उठवणे हा आमचा लोकशाही हक्क आहे. केंद्र सरकारने या अपयशाची जबाबदारी स्वीकारून दोषींवर त्वरित कडक कारवाई करावी." अशी मागणी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे.

तर पेपरफुटीसारख्या गंभीर प्रकारामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय झाला आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याऐवजी दडपशाही केली जात आहे. पारदर्शक चौकशी आणि न्यायासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील." पश्चिम विभाग काँग्रेस अध्यक्षा दीप्ती चौधरी यांनी असा इशारा दिला आहे.

आंदोलनादरम्यान पोलिसांनी सुरुवातीला कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. मात्र, आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधी घोषणाबाजी सुरूच ठेवल्याने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करत प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे काही काळ मार्केटयार्ड परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी सर्व आंदोलकांना हटवून रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत सुरळीत केली. pune
https://www.instagram.com/reel/DbfXrF7omZG/?igsh=MXZtMjM2ZTF6OXJuNw==
