મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : औंधमध्ये पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या; कारण अस्पष्ट

Pune News :पुणे : औंध परिसरातील नागरस रोड येथील राहत्या घरी पोलीस उपनिरीक्षकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

औंधमध्ये पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या; कारण अस्पष्ट
औंधमध्ये पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या; कारण अस्पष्ट

Pune News : विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात होते कार्यरत; चतु:श्रृंगी पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू

Pune News :पुणे : औंध परिसरातील नागरस रोड येथील राहत्या घरी पोलीस उपनिरीक्षकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. निलेश भाऊसाहेब पाटील (वय ५५, रा. नागरस रोड, औंध) असे मृत पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, चतु:श्रृंगी पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News

निलेश पाटील हे पुणे पोलीस दलात पोलीस अंमलदार म्हणून भरती झाले होते. अनेक वर्षांच्या सेवेनंतर त्यांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती मिळाली होती. सध्या ते विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात नियुक्तीस होते. https://maharashtramirror.com/ Pune News

पाटील यांना बुधवारी उच्च न्यायालयाशी संबंधित कामासाठी मुंबईला जायचे होते. मात्र, ते मुंबईला गेले नाहीत आणि औंधमधील घरीच थांबले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास घरातून गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यावेळी घरात असलेल्या त्यांच्या मुलाने बाहेर येऊन पाहिले असता पाटील सोफ्यावर गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले.

कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

पाटील यांना काही आरोग्यविषयक समस्या होत्या. गणेशोत्सवापूर्वी ते एक ते दोन महिने रजेवर होते. त्यानंतर गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी ते पुन्हा सेवेत रुजू झाले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाटील यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास चतु:श्रृंगी पोलीस करीत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો