Pune Police : पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीसाठी विनापरवाना ६ झाडे तोडणे पडले महागात
पुणे, महाराष्ट्र मिरर
3 મિનિટ વાંચન

Pune Police : तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर पालिकेचा फौजदारी दावा दाखल
पुणे, महाराष्ट्र मिरर
Pune police: पर्यावरणाचा बळी देऊन आणि कोणतीही पूर्वपरवानगी न घेता लोहगाव पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी ६ परिपक्व झाडे पूर्णपणे मुळासकट नष्ट केल्याप्रकरणी पुणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने अखेर कठोर पावले उचलली आहेत. नगररोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील याप्रकरणी संबंधित तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांविरुद्ध प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयामध्ये फौजदारी दावा दाखल करण्यात आला आहे.Pune police station illegal tree cutting fine
नक्की प्रकरण काय आहे?
'जीव मंडल नीता फाउंडेशन'च्या संस्थापक सौ. मोनिका छेत्री यांनी २८ फेब्रुवारी २०२६ रोजी महापालिका आयुक्त आणि वृक्ष प्राधिकरणाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. लोहगाव बस स्टँड परिसरातील जुन्या लोहगाव पोलीस चौकीचे पोलीस स्टेशनमध्ये रुपांतर करताना तिथे असलेली ५ ते ६ जिवंत व सुदृढ झाडे कोणतीही परवानगी न घेता विनापरवाना तोडण्यात आल्याचा गंभीर मुद्दा त्यांनी उपस्थित केला. Pune police

पालिकेच्या उद्यान विभागाचे प्र. हॉर्टिकल्चर मिस्त्री संदीप मारुती चव्हाण यांनी दिनांक १९ मे २०२६ रोजी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला. पंचनाम्यादरम्यान तवोबिया (१), निलगिरी (२), उंबर (१), सुबाभूळ (१) आणि अशोक (१) अशा एकूण ६ झाडांचे अवशेष पूर्णपणे काढून पुरावा नष्ट केल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी महापालिकेने विचारणा केली असता, लोहगाव पोलीस ठाण्याच्या वतीने दिनांक ११ जून २०२६ रोजी असा खुलासा देण्यात आला की, पोलीस ठाण्याच्या विस्तारासाठी आणि जनतेला आवश्यक सुविधा देण्यासाठी तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी डिसेंबर २०२५ मध्ये वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाकडे पत्र दिले होते. परवानगी मिळण्याबाबत संभ्रम व समन्वयाचा अभाव राहिल्याने तातडीच्या बांधकामासाठी ही झाडे काढावी लागली, असा युक्तिवाद पोलिसांकडून करण्यात आला.

पोलिसांचा खुलासा समाधानकारक न वाटल्याने पुणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने (नगररोड वाघोली क्षेत्रीय कार्यालय) कायद्याचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट करत १० जून २०२६ रोजी अंतिम नोटीस बजावली. अखेर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून, दाव्याच्या कामकाजासाठी वकील नेमणुकीचा प्रस्ताव मुख्य विधी अधिकाऱ्यांकडे पाठवत न्यायालयाने फौजदारी खटला दाखल करण्याची अधिकृत कारवाई पूर्ण केली आहे.
Pune Crime News : ज्येष्ठ महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणारा जेरबंद
झाडे ही केवळ मानवी मालमत्ता नसून संपूर्ण निसर्गाची आणि पर्यावरणाची अमूल्य संपत्ती आहेत. या प्रकरणी नागरिकांच्या पाठपुराव्यामुळे आणि पर्यावरणप्रेमींच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर प्रशासनाला कायदेशीर कारवाई करणे भाग पडले असून, या कठोर पावले उचलल्याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

तोडण्यात आलेल्या झाडांची सविस्तर आकडेवारी
तवोबिया जातीचे १ झाड असून, त्याचा घेर (मध्यवेढी) ०.२५ मीटर, अंदाजे उंची ५ मीटर आणि अंदाजे वय १० वर्षे होते. या प्रकरणात वृक्ष पूर्णपणे काढून पुरावा नष्ट करण्यात आला आहे. Pune police
निलगिरी जातीचे १ झाड असून, त्याचा घेर १.५० मीटर, अंदाजे उंची ८ मीटर आणि अंदाजे वय २५ वर्षे होते. या प्रकरणात वृक्ष पूर्णपणे काढून पुरावा नष्ट करण्यात आला आहे.
उंबर जातीचे १ झाड असून, त्याचा घेर ०.९० मीटर, अंदाजे उंची ३ मीटर आणि अंदाजे वय १६ वर्षे होते. या प्रकरणात वृक्ष पूर्णपणे काढून पुरावा नष्ट करण्यात आला आहे.
सुबाभूळ जातीचे १ झाड असून, त्याचा घेर ०.९० मीटर, अंदाजे उंची ३ मीटर आणि अंदाजे वय १४ वर्षे होते. या प्रकरणात वृक्ष पूर्णपणे काढून पुरावा नष्ट करण्यात आला आहे. Pune police
निलगिरी जातीचे १ झाड असून, त्याचा घेर ०.६० मीटर, अंदाजे उंची ६ मीटर आणि अंदाजे वय १५ वर्षे होते. या प्रकरणात वृक्ष पूर्णपणे काढून पुरावा नष्ट करण्यात आला आहे.
अशोक जातीचे १ झाड असून, त्याचा घेर ०.९० मीटर, अंदाजे उंची ६ मीटर आणि अंदाजे वय १८ वर्षे होते. या प्रकरणात वृक्ष पूर्णपणे काढून पुरावा नष्ट करण्यात आला आहे.
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
